मुंबई - माटुंगा रोड येथील बिग बाजाराला आज आग लागली. यामध्ये संपूर्ण बिगबाजार जळून खाक झाला आहे. लोकसभा निवडणूक असल्याने आज बिग बाजार बंद होते. त्यामुळे यावेळी जीवित हानी झाली नाही. मात्र, हा बिग बाजार महापालिका व अग्निशमन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय चालत असल्याचे, भाजप उपाध्यक्ष वसंत जाधव यांनी सांगितले आहे.
बिग बाजारला लागलेल्या आगीला पालिका अधिकारी जबाबदार - वसंत जाधव - वसंत जाधव
माटुंगा रोड येथील बिग बाजाराला आज आग लागली. यामध्ये संपूर्ण बिगबाजार जळून खाक झाला आहे. लोकसभा निवडणूक असल्याने आज बिग बाजार बंद होते. त्यामुळे यावेळी जीवित हानी झाली नाही.
![बिग बाजारला लागलेल्या आगीला पालिका अधिकारी जबाबदार - वसंत जाधव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3143570-thumbnail-3x2-mum.jpg)
यावेळी बोलताना जाधव म्हणाले, बिग बाजार विना परवानगी चालत असल्याची पालिका अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळी ही आजची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने बिग बाजार बंद असल्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच पालिकेला जाग येणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
याप्रकरणी भाजप पदाधिकाऱयांनी घडलेल्या घटनेची चौकशीची मागणी केली आहे. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.