मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक आहे. नागरिकांनी मास्क लावावे म्हणून पालिका, आरोग्य विभाग वेळोवेळी आवाहन करत आहे. त्यानंतरही मुंबईकर त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ९ लाख २५ हजार बेशिस्त मुंबईकर विनामास्क फिरताना आढळून आले आहे. त्यांच्याकडून पालिकेने १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल केला आहे.
प्रसार रोखण्यासाठी मास्क -
कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, हात धुणे, गर्दी टाळण्याचे निर्देश आहेत. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत या नियमांना फाटा दिला जात आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. संबंधितांवर कारवाईसाठी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार २४ प्रभागातील गर्दीच्या ठिकाणांवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच प्रत्येक वॉर्डातील मनपा कर्मचारी-अधिकारी आणि क्लिन-अप मार्शल या संस्थेमार्फत कारवाई सुरु आहे. तरीही विनामास्क फिरण्यांची संख्या वाढते आहे. गुरुवारी सुमारे १३ हजार १७९ मुंबईकर विनामास्क आढळले. त्यांच्याकडून २६ लाख ३५ हजार ८०० रुपयांचा दंड एकाच दिवशी आकारल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
वर्षभरात ९ लाख मुंबईकर विनामास्क फिरले -