मुंबई- येथील अनेक नागरिक आजही काही पब्स आणि नाईट क्लब मध्ये लोक संख्येने गर्दी करताना आढळत आहे. त्यांची स्वतःहून गर्दी टाळावी, अन्यथा नाईट कर्फ्यू, लावला जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चहल म्हणाले, अनलॉक अंतर्गत मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, नागरिकांकडून कोरोनाबाबातचे नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे. शहरातील नाईट क्लबवर धाडी टाकल्या आहेत. यावेळी, नाईट क्लबमध्ये हजारो लोक विनामास्क असल्याचे आढळले. ही सर्व परिस्थिती पाहता, मुंबईत पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी गर्दी टाळली नाही तर नाईट कर्फ्यू लागणारच
यावेळी पालिका आयुक्तांनी मुंबईकरांना इशाराच दिला आहे. ते म्हणाले, नागरिकांनी नाईट क्लबमधील गर्दी कमी केली नाही तर 25 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लावणार असल्याचा इशारा, आयुक्त चहल यांनी दिला आहे.