मुंबई :मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार सुरु आहे. यामध्ये डिसेंबरपासून या प्रसारात वाढ झाली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे ( Corona and Omicron variants ) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्ण इतर लोकांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन केले जाते. कोरोनासह ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने इमारती सील करण्याच्या धोरणात बदल केला आहे. त्यासाठी इमारती सील करण्याबाबत पालिका आयुक्तांनी एक परिपत्रक ( Municipal Commissioner orders administration ) काढले आहे.
प्रसार रोखण्यासाठी नवे परिपत्रक -
इमारती सील करण्याबाबत पालिका आयुक्तांचे नवे परिपत्रक या पत्रकाच्या नव्या बदलानुसार ज्या इमारती, कॉम्प्लेक्स किंवा विंगमधील 20 टक्के घरे बाधित होतील, ती इमारत सील केली जाणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी होम क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करावे. तसेच चाचणी केल्यापासून 10 दिवस होम क्वारेटाईन ( Home quarantine ) राहावे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क लोकांनी 7 दिवस होम क्वारंटाईन राहावे. त्यांनी 5 व्या आणि 7 व्या दिवशी चाचणी करावी. सील केलेल्या इमारतीमधील होम क्वारंटाईन रुग्णांची काळजी घ्यावी. कंटेंमेंट मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. इमारतीचे सील काढण्याचा निर्णय पालिकेच्या वॉर्ड लेव्हलवर घेण्यात यावा, असे आदेश पालिका आयुक्तांनी पत्रकाद्वारे ( New circular of Municipal Commissioner ) दिले आहेत. एखाद्या रुग्णाला लक्षणे आढळून आल्यास त्वरित वॉर्ड वॉर रूमशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पी साऊथमध्ये 14 दिवस इमारती सील - इमारती सील करण्याबाबत पालिका आयुक्तांचे नवे परिपत्रक पी साऊथ या विभागात पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी पत्र काढून एखादा रुग्ण आढळून आल्यास तो मजला 14 दिवस सील केली जाईल. तसेच 10 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास ती इमारत सील करण्यात येईल. सील केलेला मजला किंवा इमारतींमधून कोणालाही बाहेर जाता येणार नाही. जो मजला सील केला असेल त्याच्या खालच्या व वरच्या मजल्यावरील रहिवाशांनी 5 व्या आणि 7 व्या दिवशी कोरोना चाचण्या कराव्यात. ज्या इमारतीमध्ये 10 रुग्ण आढळून येतील, त्या इमारतीमध्ये पालिकेचे पथक जाऊन तपासणी करेल. तपासणी करण्यास विरोध केल्यास जो पर्यंत सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या ( RTPCR Tests ) केल्या जात नाहीत. तो पर्यंत सील राहतील किंवा 14 दिवस सक्तीने होम क्वारंटाईन ( 14 days forced home quarantine ) केले जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा -Vaccination for 15-18 Age : मुंबईत पहिल्याच दिवशी 6115 मुलांचे लसीकरण; वाचा मार्गदर्शक सूचना