महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळ; मुंबईच्या लाईफलाईनसह हवाई, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम - तौक्ते वादळ महाराष्ट्र

जोराच्या वाऱ्यासह सतत सुरु असलेल्या पावसाचा फटका मुंबईच्या बेस्ट आणि एसटी सेवेलाही फटका बसला आहे. शहराच्या सखल भागात पावसाचे पाणी साचल्यात असल्याने त्या भागातील अनेक बेस्टच्या बसेस वळविण्यात येत आहे. तसेच एसटीच्या अनेक बसेस रद्द करण्यात आलेल्या आहे.

mumbais-transport-disrupted-due to tauktae cyclone
मुंबईच्या लाईफलाईनसह हवाई, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम

By

Published : May 17, 2021, 1:41 PM IST

मुंबई-अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौत्के' चक्रीवादळाचा परिमाण सकाळपासून मुंबईत सुरू झाला आहे. मुंबईत वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने हवाई, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौत्के' चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले असून, ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र, आज सकाळीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुंबईच्या जीवन वाहिनीवर मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या मार्गांवर ओव्हरहेड वायर आणि एका लोकलवर झाडाच्या फांद्या पडल्या आहे. परिमाणी डाउन मार्गावरील वाहतूक रखडली आहे. धीम्या मार्गांवरील वाहतूक जलद मार्गांवरून वळविण्यात येत आहे.

मुंबईच्या लाईफलाईनसह हवाई, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम
शेकडो लोकल गाड्यांना लेट मार्क

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचून लोकलवर पडलेल्या झाडाच्या फांद्या हटवण्याचे काम युद्धस्तरावर सुरू केले होते. 11 वाजून 10 मिनिटांनी हे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, वादळासह पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या. त्यामुळे शेकडो लोकल गाड्यांना लेट मार्क लागलेला आहे.

विमान सेवा रद्द

तौत्के चक्रीवादळाच्या सर्वाधिक परिणाम हवाई वाहतुकीला बसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवरून सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत सर्व विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच विमानतळावर सुरक्षा यंत्रणासुद्धा सज्ज करण्यात आलेली आहे. तौत्के चक्रीवादळाच्या अंदाज घेऊन पुढील सूचना मिळेपर्यंत हवाई वाहुतक बंद करण्यात आलेली असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

बेस्ट आणि एसटीला फटका

जोराच्या वाऱ्यासह सतत सुरु असलेल्या पावसाचा फटका मुंबईच्या बेस्ट आणि एसटी सेवेलाही फटका बसला आहे. शहराच्या सखल भागात पावसाचे पाणी साचल्यात असल्याने त्या भागातील अनेक बेस्टच्या बसेस वळविण्यात येत आहे. तसेच एसटीच्या अनेक बसेस रद्द करण्यात आलेल्या आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागातर्फे विविध ठिकाणी वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्युत पुरवठा विभागातर्फे नियंत्रण कक्षांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक अधिकांशाने करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक आणि विद्युत पुरवठा विभागातर्फे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षांमध्येदेखील उपक्रमाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details