महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देहविक्री करणाऱ्या गरजू व वंचित महिलांना ‘सूरताल करा ओके सिंगींग क्लब’तर्फे मदतीचा हात - Lockdown effect on sex workers

सूरताल करा ओके सिंगींग क्लब, जो लोकांचे मनोरंजन करतो, त्यातील सदस्यांनीसुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना जीवनोपयोगी वस्तूंच वाटप केलं.

देहविक्री करणाऱ्या गरजू व वंचित महिलांना ‘सूरताल करा ओके सिंगींग क्लब’तर्फे मदतीचा हात
देहविक्री करणाऱ्या गरजू व वंचित महिलांना ‘सूरताल करा ओके सिंगींग क्लब’तर्फे मदतीचा हात

By

Published : Jun 6, 2021, 10:18 PM IST

मुंबई - आपल्या देशातील कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर निघाली आणि तिने पहिल्या खेपेपेक्षा यावेळी अतोनात नुकसान केले. गेल्या दीडेक वर्षांच्या काळात कोरोनामुळे देशाची आणि पर्यायाने नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा कठीण वेळी अनेक जण लोकांच्या मदतीसाठी धावून आले आणि आपापल्या परीने लोकांच्या दुःखात सहभागी होत मदतीचे वाटप केले. सूरताल करा ओके सिंगींग क्लब, जो लोकांचे मनोरंजन करतो, त्यातील सदस्यांनीसुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना जीवनोपयोगी वस्तूंच वाटप केलं.

सर्व गायकांचे सहकार्य

समाजातील अश्या वंचित व दुर्लक्षित महिलांसाठी विले पार्ले पूर्व येथील "सूर ताल करा ओके सिंगींग क्लब"तर्फे अमृता देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गरजू, गरीब व वंचित गटातील महिलांना गरजेच्या वस्तूंच वाटप करून मदत करण्यात आली. सूरताल क्लब मधील सर्व गायकांचे सहकार्य ह्या उपक्रमास लाभले होते.

लॉकडाऊनची झळ समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना बसली आहे. ज्यात देहविक्री करणाऱ्या महिलांना सुद्धा आहेत. १५ एप्रिल रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या सेक्स वर्कर्सचं आयुष्य उद्धवस्त होऊन गेलं. त्यांना आता जगणं कठीण होऊन बसलं आहे. त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. यांच्यापैकी बहुतेकजणी स्थलांतरित आहेत. स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे दस्तावेजही नाहीत.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

फॉकलंड रोड (पठ्ठे बापूराव मार्ग ) तसेच गिरगावातील कांदेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाशेजारी देहविक्री करणाऱ्या महिलांची वसाहत आहे. त्यांच्या करिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अमृता देवधर, सुरताल ग्रुप, विलेपार्ले पूर्व, यांच्या वतीने करण्यात आले. १०० महिलांसाठी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले होते. अजून कोरोनाचा धोका पूर्णतः टळलेला नाही. सर्वत्र अस्थिरता असल्याने पुढेही मुंबईतील अनेक गरजूंना, त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार असल्याचा मानस अमृता देवधर यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details