मुंबई :बनावट पोलीस अधिकारी हा आरोपी सहाय्यक पोलिसाच्या गणवेशात फिरत होता. त्याच्याजवळ पोलिसांप्रमाणे पल्सर १८० दुचाकी होती. त्यावर पोलीस नावाचे स्टिकर, पोलिसांप्रमाणे हॅल्मेट व पोलिसांप्रमाणे बनावट ओळखपत्र देखील आढळून आले आहे. त्यामुळे त्याच्यावर फार कुणाला संशय येत नसे. तसेच छोट्या मोठ्या दुकानात जाऊन हा आरोपी किरकोळ साहित्य कारवाईच्या नावावर दुकानदारांकडून फुकट घेऊन जात होता.
बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक : दरम्यान अंधेरी एमआयडीसी परिसरात हा तोतया अधिकारी सिगारेटचा बाॅक्स मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकत असल्याने त्याच्यावर पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीत तो तोतया असून मागील अनेक वर्षापासून अशा प्रकारे फसवणूक करत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. पान दुकानांवर विदेशी सिगारेट ठेवण्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या बहाण्याने तो मोठ्या प्रमाणावर होर्डिंग करायचा.
विदेशी सिगारेटची पाकिटे जप्त :कैलास खामकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांचे ओळखपत्र आणि विदेशी सिगारेटची अनेक पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांचे डीसीपी महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय होता. त्या आधारे चौकशी केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे समोर आले. हा बनावट पोलिस अधिकारी साकीनाका हद्दीतील एका पान दुकानदाराची शिकार करण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान तेथून जाणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला त्याचा संशय आला.