मुंबई - मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मुंबईचे महापौर आणि शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले आहेत. महाडेश्वरांची एककीकडे आमदारकीची संधी हुकली असताना येत्या 22 नोव्हेंबरला महापौर पदासाठी निवडणूक होणार असल्याने महिनाभरात महापौर पदही सोडावे लागणार आहे.
महाडेश्वरांची आमदारकी हुकली, महिनाभरात महापौरपदही जाणार
वांद्रे-पूर्व मतदार संघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. या मतदार संघात कट्टर शिवसैनिक बाळा सावंत यांचे वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर या मतदार संघातून त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवली होती. तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता. तृप्ती सावंत यांनी 2 वेळा या मतदार संघातून शिवसेनेला विजय मिळवून दिला होता. यावेळीही सावंत यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते अनिल परब यांच्या मध्यस्थीने रात्री 3 वाजता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली.
वांद्रे-पूर्व मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. या मतदारसंघात कट्टर शिवसैनिक बाळा सावंत यांचे वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर येथून त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवली होती. तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता. तृप्ती सावंत यांनी 2 वेळा येथून शिवसेनेला विजय मिळवून दिला होता. यावेळीही सावंत यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते अनिल परब यांच्या मध्यस्थीने रात्री 3 वाजता महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली.
हेही वाचा -काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दणदणीत विजय; डॉ.परिणय फुकेंचा पराभव
वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेने महाडेश्वरांना उमेदवारी दिल्याने तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली. या दोघांमधील मत विभागणीमुळे काँग्रेसचे झिशान सिद्दीकी निवडून आले. महाडेश्वर यांचे महापौर असताना आमदार बनण्याचे स्वप्न भंगले आहे. मुंबईचे महापौरपद अडीच वर्षाचे असते. विधानसभा निवडणुकीमुळे महापौरपदाला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत येत्या 21 नोव्हेंबरला संपत आहे. महापौरपदाच्या आरक्षणाबाबत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढली जाणार आहे. यामुळे पदाचा कालावधी पूर्ण होत असल्याने त्यांना महापौरपद सोडावे लागणार आहे.