मुंबई - देशभरात ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन खाटांनी सुसज्ज असे चुनाभट्टी येथील जंबो कोविड सेंटर ( Oxygen Equipped Jumbo Covid Center ) लवकर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी या कोविड सेंटरची पाहणी केली. ( MP Rahul Shevale Visited Chunabhatti Covid Center )
चुनाभट्टी येथील सोमैया ट्रस्टच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या या कोविड सेंटरच्या कामाचा आढावा खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्वच्या सर्व 1200 खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा आहे. याठिकाणी अतिदक्षता विभाग आणि लहान मुलांसाठीही विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे. म्हाडाच्या वतीने उभारण्यात आलेले हे सेंटर येत्या 15 दिवसांत सुरू होणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी प्रतिक्रिया खासदार शेवाळे यांनी दिली.