मुंबई -राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना निर्माण झालेली लॉकडाऊनच्या स्थितीबाबत मुंबईकरांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट...
रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये लॉकडाऊनची धास्ती वाढू लागली आहे. 'निर्बंध अधिक कडक करा पण, लॉकडाऊन करू नका' असे मत सर्वसामान्या मुंबईकरांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाऊन राज्य सरकारचे अपयश लपवण्यासाठी तर नाही ना?
मागील वर्षी कोरोनाबाबत कुणालाही अधिक माहिती नव्हती. यामुळे अनेक देशांमध्ये अचानक लॉकडाऊन करावा लागला होता. मात्र, आता कोरोनाबाबत सर्वांना माहिती उपलब्ध झाली आहे. लसही तयार झाली आहे. असे असताना महाराष्ट्रात पुन्हा लॉक करण्याची गरज काय आहे? आता रुग्णसंख्या वाढते आहे, यामागे सरकारचे गाफील असणे कारण आहे का? सर्वसामान्य नागरिकांना नोकरी नाही. अनेकांना एक वेळेचे अन्न देखील मिळत नाही. हे लॉकडाऊन राज्य सरकारचा अपयश लपवण्यासाठी तर नाही ना? असे कुठेतरी वाटत आहे आहे, असे नागरिक निलेश साळवी यांनी सांगितले.
हातावर पोट असणाऱ्यांची होईल उपासमार -
राज्य सरकारने लॉकडाऊन करू नये, असे आमचे म्हणणे आहे. आता कुठे सर्व पूर्वपदावर यायला सुरुवात झाली होती. पुन्हा एकदा टाळे बंदी झाली तर आम्ही हातावर पोट असणाऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न आमच्या समोर उभा राहील. राज्य सरकारने कडक नियम केले तरी चालतील मात्र, लॉकडाऊन करू नये, असे राजेश चिपळूणकर यांनी सांगितले.
फक्त नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी -