महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना विषाणूला तोंड देण्यासाठी मुंबईकर सतर्क; मेट्रो बंदचा निर्णय नाही - corona in mumbai

मुंबईची लोकल सात दिवस बंद ठेवावी अशी मागणी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशी काही चर्चा झाली नसल्याचे उत्तर दिले आहे.

corona in mumbai
कोरोना विषाणूला तोंड देण्यासाठी मुंबईकर सतर्क; मेट्रो बंदचा निर्णय नाही

By

Published : Mar 18, 2020, 12:56 AM IST

मुंबई -कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. घाटकोपर ते वर्सोवा जाणारे मेट्रो प्रवासी मेट्रो स्थानक तसेच डब्यामध्ये मास्कचा वापरत करीत असल्याचे दिसून येत आहे. मेट्रो बंद बाबत चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली नसल्याचं आणि लोकल बंद करण्याचा निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कोरोना विषाणूला तोंड देण्यासाठी मुंबईकर सतर्क; मेट्रो बंदचा निर्णय नाही

हेही वाचा -Coronavirus : भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, राज्यात 39 जण आढळले

मुंबईत कोरोना विषाणूच्या बाधित रुग्णाची हळूहळू होत असलेल्या वाढीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आज टिळक नगर परिसरातील 63 वर्षीय कोरोना संशीयत व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालय येथे उपचार चालू असताना, मृत्यू झाला. त्यामुळे चिंतेत भर पडली होती. मात्र, त्या व्यक्तीचा मृत्यू कोरनामुळे नसून, इतर आजाराने झाल्याचे प्रशासनाने सायंकाळी स्पष्ट केले.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्य रेल्वेने एकूण २२ ट्रेन्स रद्द केल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्या आहेत. गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेले ३९ रुग्ण आहेत. तसंच ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

मुंबईची लोकल सात दिवस बंद ठेवावी अशी मागणी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली होती. राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी असा निर्णय घेतला तर मी त्या निर्णयाला पाठिंबा देईन असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. मात्र अशी कोणतीही चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली नसल्याचं आणि लोकल बंद करण्याचा निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र गर्दी करुन, आवश्यकता नसताना घराबाहेर पडून आम्हाला नाईलाजास्तव काही निर्णय घ्यायला भाग पाडू नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details