महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पोलीस दलात व्हायरल झालेल्या 'त्या' पत्राची महिला आयोगाने घेतली दखल - लैगिक शोषणाची बातमी

Mumbai Women Police letter : मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभागातील ८ महिला पोलीसांनी त्यांचा वरिष्ठ पोलीसांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार पत्राद्वारे केल्याचं विविध माध्यमांतून समोर आलं आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. पोलीस आयुक्त यांना या प्रकरणाची सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तत्काळ पाठवण्याचे निर्देश, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी संजना भुवड (Sanjana Bhuvad) यांनी दिले आहेत.

Mumbai Women Police letter
व्हायरल झालेल्या पत्राची महिला आयोगाने घेतली दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 10:58 PM IST

Updated : Jan 9, 2024, 10:31 PM IST

मुंबई Mumbai Women Police letter : महिला पोलीस शिपाई चालक, मोटार परिवहन विभाग नागपाडा येथील लैगिक शोषणाची बातमी समाज माध्यमाद्वारे प्रसारित होत असलेल्या पत्राची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी राज्य महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी संजना भुवड (Sanjana Bhuvad) यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात भुवड यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(१) (क) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे, याकरीता महिला आयोग कार्यरत आहे.

व्हायरल झालेल्या पत्राची महिला आयोगाने घेतली दाखल


आयोगाने घेतली दखल : मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभाग नागपाडा येथील ८ महिला पोलीसांनी, त्यांच्या विभागातील वरिष्ठ पोलीसांकडून लैंगिक छळ होत असल्याची बातमी समाज माध्यमाद्वारे प्रसारित होत आहे. या बातमीची आयोगाने दखल घेतली आहे. तरी हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असून या प्रकरणाची सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२/३) नुसार आयोगास तत्काळ पाठविण्याची विनंती पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.


पत्रात ८ महिला कॉन्स्टेबलची नावे : शुक्रवारपासून मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभाग नागपाडा येथील ८ महिला पोलिसांच्या नावे लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, प्रशासन विभागाचे पोलीस सहआयुक्त, गुन्हे विभागाचे पोलीस सहआयुक्त आणि वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त, नागपाडा येथील मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपायुक्त या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लिहिले आहे. या पत्रात ८ महिला कॉन्स्टेबलची नावे आहेत. ज्यांनी त्यांच्यावर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलीस विभागातील इन्स्पेक्टरपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांनीच लैंगिक अत्याचाराचे दुष्कृत्य केलं असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं. नंतर हे पत्र वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झालं.

पत्र फेक असल्याची माहिती : पत्राची सत्यता पाहण्यासाठी पत्रात उल्लेख असलेल्या आठ महिला पोलिसांना बोलावून अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, असं काहीही नसून ते पत्र त्यांनी लिहिलं नसल्याचं उघडकीस आलं आहे. अर्थात प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त एस जयकुमार यांनी प्राथमिक स्थरावर हे पत्र फेक असल्याची माहिती देत पत्र पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा -

  1. Woman Cop Molested धार्मीक कार्यक्रमात महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग; पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह तिघांना घेतलं ताब्यात
  2. सॅल्युट : सात महिन्यांची गर्भवती महिला पोलीस शिपाई बजावते 12 तास ड्युटी
  3. Police Raped Lady Police : पिस्तुलचा धाक दाखवून पोलिसाचा महिला पोलिसावर वारंवार अत्याचार
Last Updated : Jan 9, 2024, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details