मुंबई - मुंबईचा विकास करायचा आहे तसेच पुनर्विकासाचे प्रकल्पही पुढे नेत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बीकेसीमधील सभेत बोलत होते. कुणी कितीही टीका केली तरी आपण काम करत आहोत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. पुढील तीन वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्राचे पाठबळ आपल्याकडे असणार आहे.
महाविकास आघाडी सरकारवर टीका - येणाऱ्या काही दिवसात महापालिकेच्या निवडणुका होतील. विकासाचे डबल इंजिन ट्रिपल इंजिनमध्ये परिवर्तित होईल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ठाकरे सरकारने अनेक प्रकल्प रखडवले असे शिंदे म्हणाले. मात्र यापुढे तसे होणार नाही. मुंबईला ट्रिपल इंजिनची शक्ती मिळेल आणि मुंबईचा संपूर्ण कायापालट होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांची ठाकरे सरकारवर टीका - आज भारत अभूतपूर्व सकारात्मक उर्जेने काम करत आहे. आजपर्यंत फक्त गरिबीची चर्चा झाली. मात्र, आम्ही आता प्रत्यक्ष काम करत आहोत. सध्या देशात एका बाजूला घर, बाथरूम, लाईट, मोफत उपचार, गॅस, पाणी या सुविधांचा विकास होत आहे. तर, दुसरीकडे आधूनिक संसाधनांचाही मोठ्या प्रमाणता विकास होत आहे असा दावा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. ते आज बीकेसी मैदानातून जनतेला संबोधिक करताना बोलत होते. दरम्यान, काही काळ महाराष्ट्राचा विकास थांबला होता. मात्र, शिंदे-फडणवीस यांची जोडी येताच विकासाला गती आली आहे असे म्हणत पंतप्रधानांनी ठाकरे सरकारवर टीका करत नवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.
सीएसएमटीचा पुनर्विकास -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जग आर्थिक संकटात सापडले असताना, भारत अनुदान देत आहे. “डबल इंजिन सरकार गरीबातील गरीब लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळे विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांचाही विकास केला जात आहे. सर्वात जुने रेल्वे स्थानक असलेल्या सीएसएमटीचा पुनर्विकास केला जात आहे. आम्ही मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी जोर देत आहोत. पंतप्रधान वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावरून बोलत होते. तिथे त्यांनी दोन नवीन मुंबई मेट्रो लाईन, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पीएम स्वानिधी योजनेसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले.
ईच्छाशक्तीची काहीही कमी नाही : येणारऱ्या काळात धारावी पुनर्विका, मेट्रो यासर अनेक विकास कामे होणार आहेत. त्या सर्व कामे लक्षात घेऊन मी शिंदे-फडणवीस याचे अभिनंदन करतो. आज सरकार हे डबल इंजिन आहे. त्यामुळे कामे वेगाने होत आहेत. वाहतूकीबाबतही देशात काम सुरू आहे. तसेच, शहरातील कचरा प्रश्नही आधुनिक संसाधनांचा वापर करत लवकरच त्याच्यावर काम होणार आहे. याममध्ये संसाधनांची आणि ईच्छाशक्तीची काहीही कमी नाही. असही ते म्हणाले आहेत.
पंतप्रधानांची अप्रत्यक्ष शिवसेनेवर टीका : मुंबई शहरांचा विकास करताना स्थानिक शासनाचीही तशीच मानसिकता पाहिजे. दोन्ही जागेवर एकाच विचारांचे सरकार पाहिजे असे म्हणत मुंबई मनपातही भाजपचीच सत्ता असती तर विकास आणखी वेगात झाला असता असा पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. परंतु, पैसा असतानाही तो खर्च न होणे हे योग्य नाही. भाजपची सरकार असो किंवा आणखी कोणती असो आम्ही विकासाच्या आड राजकारण आणत नाहीत. आणि विकासाचे राजकारण करतो. असे म्हणत पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर टीका केली आहे.
हेही वाचा -Prime Minister Interact Students : मेट्रो स्थानाकात पंतप्रधान साधणार मुंबईतील सहा विद्यार्थ्यांशी संवाद