महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईचा पाऊस; असल्फा मेट्रो स्थानकाखाली नदीचे स्वरूप - problems

मुंबईत सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर आहे. पूर्व उपनगरात जोरदार पाऊस बरसत असून असल्फा मेट्रो स्टेशन जवळ पाणी तुंबल्याने स्टेशनच्या खाली नदीचे रूप पाहायला मिळत आहे.

असल्फा मेट्रो स्थानक

By

Published : Jul 8, 2019, 12:38 PM IST

Updated : Jul 8, 2019, 3:13 PM IST

मुंबई - गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने मुंबईत थैमान घातले होते. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून सलग कोसळत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांचे हाल सुरू केले आहेत.

असल्फा मेट्रो स्थानकाखाली साचलेले पाणी


मुंबईत सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. पूर्व उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मात्र या पावसाच्या पाण्यामुळे असल्फा मेट्रो स्टेशनच्या खालच्या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


असल्फा मेट्रो स्टेशन जवळ नेहमीच पाणी तुंबते आणि त्यामुळे आजू-बाजूच्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. या तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतूक देखील मंदावल्याचे पाहायला मिळत आहे, तर इथे नेहमीच पाणी तुंबत असले तरी अजूनही ठोस उपाय यावर करण्यात आलेला नाही.

Last Updated : Jul 8, 2019, 3:13 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details