महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंधेरीत पेपर बॉक्स इंडस्ट्रीयल इस्टेटची भिंत कोसळली - पर बॉक्स इंडस्ट्रीयल इस्टेस्टची भिंत कोसळली

सोमवार सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरीच्या एमआयडीसी मालपा डोंगरी येथील पेपर बॉक्स इंडस्ट्रीयल इस्टेटची भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पेपर बॉक्स इंडस्ट्रीयल इस्टेस्टची भिंत कोसळली

By

Published : Jul 8, 2019, 2:02 PM IST

Updated : Jul 8, 2019, 3:14 PM IST

मुंबई - पावसामुळे शहरात भिंत कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी सकाळी 11 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास अंधेरीतील एमआयडीसी परिसरात भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

बॉक्स इंडस्ट्रीयल इस्टेटची भिंत कोसळली


सोमवार सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईचे जीवन विस्कळीत झाले आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी नुकसान झाले. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरीच्या एमआयडीसीतील मालपा डोंगरी येथील पेपर बॉक्स इंडस्ट्रीयल इस्टेस्ट येथे ही भिंत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


मागच्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे 2 जुलै रोजी मालाडच्या पिंपरी पाडा येथील संरक्षक भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 105 जण जखमी झाले होते.

Last Updated : Jul 8, 2019, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details