महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आजपासून महापालिकेच्या ५ केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण; नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लशींचा मोजकाच साठा नुकताच प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने आज रोजी महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर केवळ १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.

5 Center Vaccination Mumbai
मुंबई महापालिका लसीकरण

By

Published : May 1, 2021, 4:22 AM IST

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लशींचा मोजकाच साठा नुकताच प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने आज रोजी महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर केवळ १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच, सध्यातरी लशीचा केवळ पहिला डोस घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -मुंबईकरांसाठी 16 कोटींचे 100 चायनीज व्हेंटिलेटर; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

आज पासून लसीकरण

केंद्र सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे घोषित केले आहे. पालिकेने 227 नगरसेवक आणि खासगी रुग्णालयांत या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र राज्य सरकारने लसीकरण मोफत करण्याचे, तसेच साठा असेल त्याप्रमाणे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासून पालिकेच्या 5 रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात होत आहे.

गर्दी करू नका

भविष्यात लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे या निमित्ताने करण्यात आले आहे.

लसीकरण केंद्रांची नावे -

१. बा.य.ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

हेही वाचा -लसीकरणाची जबाबदारी पेलण्यास राज्य सरकार समर्थ - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details