मुंबई : राज्यामध्ये महत्त्वाच्या स्पर्धा या जानेवारी फेब्रुवारी दरम्यान होत असतात. सर्व विद्यापीठांच्या स्पर्धा 12 ते 15 जानेवारी या दरम्यान पार पडल्या आणि पंधराव्या अंतर विद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने आपले विजेतेपद पटकावले. त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस कामगिरीदेखील केली.
22 विद्यापीठांचा सहभाग : संशोधनाची वृत्ती वाढीस लागावी त्यामध्ये उत्तरोत्तर विकास व्हावा. एक विकसित राष्ट्र म्हणून आपण ज्यावेळेला जगासमोर उभे राहतो. हे संशोधनाच्या आधारे मिळालेल्या यशाने समजते. देशामध्ये विविध विद्यापीठ आहेत. मुंबई विद्यापीठ हे अत्यंत जुने आणि नावाजलेले प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून त्याची ख्याती आहे. यंदाच्या अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 22 विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. या विद्यापीठांमध्ये या स्पर्धेसाठी मानव विद्या भाषा तसेच कला त्याशिवाय वाणिज्य व्यवस्थापन विधी, मूलभूत शास्त्रे, शेती, पशूसंवर्धन, अभियांत्रिकी तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र व औषध शास्त्र अशा वेगवेगळ्या 48 विषयांमध्ये संशोधन प्रकल्प या स्पर्धेसाठी पाठवले गेले.
48 प्रकल्प सादर :मुंबई विद्यापीठाने एकूण स्पर्धेसाठी 48 प्रकल्प सादर केले होते. या 48 मध्ये मानव विद्या भाषा कला यामध्ये तीन सुवर्ण पदक, एक रौप्य पदक, एक कांस्यपदक पटकावले. वाणिज्य व्यवस्थापन आमि विधी या विषयात एक सुवर्ण पदक पटकाले. तर मूलभूत शास्त्रे या प्रवर्गात एक सुवर्ण, एक रौप्य, कांस्य पदक मिळवले. शेती व पशुसंवर्धन या प्रवर्गात देखील तीन सुवर्ण पदक मिळवले. अभियांत्रिकी तंत्रज्ञान या प्रवर्गात तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पटकाले. वैद्यकीयशास्त्र व औषध शास्त्र या प्रवर्गात एक सुवर्ण पदक आणि एक रौप्य तर एक कांस्य पदक पटकावले.