महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगितीचा निर्णय राजकीय दबावापोटी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल - स्थगिती नियमबाह्य

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक जाहीर करुन त्यानंतर पुढं ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मोठं राजकीय वादंग उठलं आहे. याविरोधात अ‍ॅड सागर देवरे यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Mumbai University Election
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 11:12 AM IST

अ‍ॅड सागर देवरे यांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्य सरकारनं मुंबई विद्यापीठाची पदवीधर निवडणूक 9 ऑगस्टला जाहीर केली होती. मात्र अचानक महाराष्ट्र शासनानं होऊ घातलेली पदविधर निवडणूक स्थगित केली. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते, अ‍ॅड सागर देवरे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. त्यात त्यांनी ही स्थगिती नियमबाह्य असल्यामुळे निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

नोव्हेंबरमध्ये होणार होती निवडणूक :मुंबई विद्यापीठामध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार होती. परंतु ती निवडणूक पुढं ढकलण्यात आली. मात्र आता 2023 मध्ये निवडणुकांसाठीचं वेळापत्रक मुंबई विद्यापीठानं जाहीर केलं होतं. 10 सप्टेंबरला प्रस्तावित निवडणूक अचानकपणानं राजकीय दबावापोटी 17 ऑगस्टला मुंबई विद्यापीठानं स्थगित केल्या दावा सामाजिक कार्यकर्ते सागर देवरे यांनी केलायं. निवडणूक स्थगित करणं विद्यापीठाच्या नियमांशी विसंगत असल्याचा दावा याचिकेमध्ये सागर देवरे यांनी केला आहे.

जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती देता येत नाही :विद्यापीठाच्या जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती देता येत नसल्याचं सागर देवरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे जाहीर झालेली निवडणूक स्थगित करण्याची मुंबई विद्यापीठाची कृती बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या निवडणुका 'एकरूप परिनियम 2017' व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसारच घेतल्या पाहिजे, असंही याचिकाकर्ते वकील सागर देवरे यांनी यावेळी सांगितलं. मात्र या नियमाला डावलून निवडणूक स्थगित केल्या जात आहेत. त्या पाठीमागं राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.

स्थगितीचा निर्णय रद्द करुन निवडणूक घ्या :विद्यापीठाच्या अधिनियमानुसार निवडणुका जाहीर केल्यानंतर निवडणुकीला स्थगिती देता येत नाही. म्हणूनच 17 ऑगस्ट 2023 रोजी घेतलेला निवडणुका स्थगितीचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. याबाबत वकील सागर देवरे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, विद्यापीठाची निवडणूक ही नोव्हेंबर 2022 मध्येच होणार होती. नियमानुसार त्यावेळेलाच निवडणूक घेणे गरजेचे होते. 17 ऑगस्ट 2023 रोजी निवडणुकीचा निर्णय रद्द करण्यात आला. ही कृती म्हणजे नियमबाह्य पद्धतीनं निवडणुकींना स्थगिती आहे. त्यामुळे स्थगितीचा निर्णय रद्द करून निवडणूक मुदतीत आणि वेळेतच घेणं आवश्यक आहे' असं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Mumbai University : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुढे ढकलण्यामागे नक्की कोणते राजकारण? विद्यार्थी संघटना आक्रमक
  2. Nitesh Rane On Senate Election : 'यासाठी' हव्यात सिनेट निवडणुका; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
  3. MU Senate Election : सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details