महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाचा ६९५ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर; नवसंशोधनासाठी केवळ ५ लाखांची तरतूद

या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरसह माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी सुरू केलेल्या अनेक शिक्षण विकासाच्या योजनांना एकही रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने त्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई विद्यापीठाचा ६९५ कोटीचा अर्थसंकल्प

By

Published : Apr 26, 2019, 8:27 AM IST

मुंबई- मुंबई विद्यापीठाचा २०१९- २० सालचा ६९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ६८.८१ कोटींची तूट दाखविण्यात आली आहे. नविन बांधकामे, भौतिक सुधारणा यावर विशेष भर देण्यात आला आहे. मात्र, गुणवत्ता विकास आणि संशोधनासाठी विशेष तरतुदी नसल्याने सिनेट सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मोठ्या प्रमाणात अनेक योजनांचा गाजावाजा करणाऱ्या या अर्थसंकल्पात नवसंशोधनासाठी केवळ ५ लाख रुपयांची तरतुद केली आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या ५०० मुलींच्या वस्तीगृहासाठी पुन्हा एकदा ४ कोटी आणि त्यासोबतच अतिथीगृहासाठीही तशीच तरतूद करण्यात आली आहे. गुणवत्ता विकासाठी योजना दाखवण्यात आलेल्या असल्या तरी त्यासाठी भरीव तरतूद नसल्याने याविषयी सिनेट सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरसह माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी सुरू केलेल्या अनेक शिक्षण विकासाच्या योजनांना एकही रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने त्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विद्यापीठाकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात विद्यार्थी, विकास, संशोधन, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरक्षण, वित्तीय स्वयंपूर्तता आणि पारितोषिके, अशा बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तर संशोधनवृत्तीला चालना देऊन संशोधन संस्कृती रुजविण्यासाठी संशोधन करुन प्रकाशनासाठीचा पुरस्कार, संशोधनासाठी नविन उपक्रम राबविण्यासाठी नेतृत्व करणे, संशोधनासंदर्भात सल्ला मसलत, पुस्तक प्रकाशन, उत्कृष्ट संशोधन, नविन संशोधकांना प्रोत्साहन, एम.फीलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, व्हाईस चान्सलर फेलोज, इन्क्युबेशन सेंटर, महिलांसाठी कल्याणकारी योजना आणल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय सहभाग कक्ष, इतर विद्यापीठातील उत्कृष्ट कामाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा सदस्य यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा, सहयोगी प्राध्यापक आणि प्रा. बाळ आपटे अध्यासन केंद्र, अशा नाविण्यपूर्ण बाबींवर आधारीत विशेष अर्थसंकल्पीय तरतूदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देण्यात आला असल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे.

याबरोबरच २०१९-२० या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आला असून यामध्ये विद्यार्थी भवन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत, तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी वसाहत, संग्रहालय कॉम्प्लेक्स इमारत, १०० क्षमतेचे अतिथीगृह आणि ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह, अशा नियोजित बांधकामाना प्राधान्य देण्यात आले असल्याचे आज कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details