महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाच्या जमीन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा;  माजी कुलगुरू मुणगेकरांची मागणी - mumbai university land scam

मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी साडे आठ एकर जमीन एमएमआरडीए देण्यासाठी कार्यवाही केली. या सर्व व्यवहारात मोठा घोटाळा झाला असल्याची शक्यता असल्याने त्याला तत्काळ स्थगिती द्यावी. सुरुवातीपासून जो व्यवहार झाला आहे, त्याची सरकारने आणि कुलपती यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज केली.

mumbai
मुंबई विद्यापीठात साडेआठ एकराचा संभाव्य जमीन घोटाळा

By

Published : Dec 19, 2019, 2:39 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी साडे आठ एकर जमीन एमएमआरडीए देण्यासाठी कार्यवाही केली. त्यातून विद्यापीठाचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या सर्व व्यवहारात मोठा घोटाळा झाला असल्याची शक्यता असल्याने त्याला तत्काळ स्थगिती द्यावी. सुरुवातीपासून जो व्यवहार झाला आहे, त्याची सरकारने आणि कुलपती यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज केली.

मुंबई विद्यापीठातील साडे आठ एकर संभाव्य जमीन घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

विद्यापीठाच्या कालिना संकुलातील साडे ८ एकर जमीन ही एमएमआरडीएला देण्याबाबत तत्कालीन कुलगुरूंनी १९ मे २०१६ रोजी पत्र लिहून सरकारला विनंती केली होती. यात त्यांनी ही जमीन एक एलिव्हेटेड आणि दुसरा डीपीरोड बनवण्यासाठी आम्ही देण्यासाठी तयार असल्याचे सांगत त्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, इतकी मोठी जमीन कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय देण्याचा आणि कोणत्याही प्रकारची पारदर्शक अशी कार्यवाही न करता हा व्यवहार झाला आहे. असा निर्णय घेण्यासाठी कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेची परवानगी घेतली नव्हती. त्यातच यासाठी विद्यापीठाने इमारत विकासाचा कोणताही प्लॅन तयार केला नव्हता. यात मोठा गैरप्रकार झाला असावा, त्यामुळे या व्यवहाराला तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी मी राज्यपालांकडे केली असल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले. तसेच लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.

या जमिनीच्या मोबदल्यात एमएमआरडीकडून तितका टीडीआर देण्याचे सांगितले होते. त्यातून जो पैसा मिळेल तो एमएमआरडीएकडे राहील आणि ते जेव्हा गरज लागेल तेव्हा विद्यापीठ घेईल, अशी तरतूद यात आहे. हा अत्यंत गंभीर विषय असून विद्यापीठाचे भवितव्य धोक्यात आणणारा आहे. देशातील कोणत्याही विद्यापीठात असे रस्ते आणून त्याला विभागण्याचा प्रकार मी पाहिला नाही. यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. मुणगेकरांनी केली.

हेही वाचा - रेस कोर्सजवळ पाईपलाईन फुटली; मुंबई सेंट्रल परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

मी ३१ नोव्हेंबर रोजी यासाठी राज्यपालांना पत्र लिहून याची माहिती दिली होती. हा घोटाळा होणार आहे, त्याला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणीही या पत्रात केली आहे. त्याचप्रमाणे आणखी एक गंभीर प्रकरण विद्यापीठात सुरू असून विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील ५० विभाग कालिना संकुलात आणले जाणार आहेत. हे फोर्ट संकुल रिकामे करून ते विल्सन आणि इतर महाविद्यालयल्याच्या क्लस्टर विद्यापीठाला देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोपही मुणगेकर यांनी यावेळी केला.

हेही वाचा - विक्रोळीत शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

ABOUT THE AUTHOR

...view details