महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्युएस जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठाची भरारी - क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2019

क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. 'क्वॅककॉलिर्स सायमंड्स' (क्युएस) या जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत आयआयटी मुंबई, आयआयटी मद्राससह दिल्ली विद्यापीठाने पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले आहे.

मुंबई विद्यापीठ

By

Published : Sep 19, 2019, 10:14 PM IST

मुंबई -'क्वॅककॉलिर्स सायमंड्स' (क्युएस) या जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत आयआयटी मुंबई, आयआयटी मद्राससह दिल्ली विद्यापीठाने पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले आहे. मागील वर्षी क्युएस जागतिक क्रमवारीत ८०१ व्या स्थानावर असलेल्या मुंबई विद्यापीठाने झेप घेत २५१ ते ३०० या क्रमवारीत येण्याचा मान पटकावला आहे.


क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात देशातील अनेक विद्यापीठांनी आपले स्थान बळकट केले आहे. मात्र, काही अपवाद वगळता भारतीय विद्यापीठांची कामगिरी यंदाही निराशाजनक ठरली आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने तर या रँकिंगसाठी आपला अर्जच केला नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - भारताची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत, सत्य स्वीकारायला हवे - सचिन पायलट

नुकत्याच जाहीर झालेल्या क्युएस जागतिक क्रमावारीत ११० ते १२० व्या स्थानावर आयआयटी मुंबई, दिल्ली येथील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी १५१ ते १६० या स्थानावर तर आयआयटी मद्रास १७१ ते १८० आणि दिल्ली विद्यापीठाचा १९१ ते २०० क्रमवारीत येण्याचा मान पटकावला आहे. यानंतर २०१ ते २५० मध्ये आयआयटी खरगपूर, २५१ ते ३०० बिर्ला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, आणि ३०१ ते ५०० आयआयटी कानपूरचा या क्रमवारीत समावेश झाला आहे.


जगभरातील विद्यापीठांच्या या क्रमवारीत यंदाही अमेरिकेतील विद्यापीठांनी आपली मक्तेदारी कायम ठेवली आहे. पहिल्या शंभरमध्ये २५ पेक्षा जास्त अमेरिकन विद्यापीठांचा समावेश आहे. पहिल्या स्थानावर मॅसेच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुसऱ्या स्थानावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ, तिसऱ्या स्थानावर युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details