महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एनआयआरएफ रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने केली प्रगती; केंद्र सरकारने जाहीर केली विद्यापीठांची क्रमवारी - मुंबई विद्यापीठ एनआयआरएफ रँकिंग

देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (एनआयआरएफ) तर्फे आज जाहीर करण्यात आली. मुंबई विद्यापीठाने यंदा चांगली प्रगती केली असून 81 व्या क्रमांकवरून 65 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. देशातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयटी मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे.

Mumbai University
मुंबई विद्यापीठ

By

Published : Jun 11, 2020, 8:56 PM IST

मुंबई - केंद्र सरकारच्यावतीने देशातील उत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी जाहीर झाली आहे. देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नवव्या क्रमांकावर येण्याचा मान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाने यंदा चांगली प्रगती केली असून 81 व्या क्रमांकवरून 65 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

देशातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयटी मद्रासने पहिला क्रमांक मिळवला असून आयआयटी मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. याबाबतचा एक अहवाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज दिल्लीत जाहीर केला.

देशातील सर्वोत्कृष्ट शंभर विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर पोहचले आहे. तर महाराष्ट्रातील पारंपारिक राज्य विद्यापीठांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सुधारली असून मागील वर्षी मुंबई विद्यापीठ ८१ व्या स्थानावर होते. विद्यापीठांच्या क्रमवारीसोबतच सर्वसाधारण क्रमवारीतही विद्यापीठाने मोठी मजल मारली असून ४२.४५ गुणांसह ९५ व्या स्थानावर पोहचले आहे. मागच्या वेळी सर्वसाधारण क्रमवारीत १०१-१५० या रँकिंग बँडदरम्यान मुंबई विद्यापीठाचे स्थान होते. देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (एनआयआरएफ) तर्फे आज जाहीर करण्यात आली.

एकूण पाच वर्गवारीमध्ये विभागल्या गेलेल्या निकषांनुसार मुंबई विद्यापीठाला प्रत्येकी १०० गुणांपैकी, टिचींग लर्निंग अँड रिसॉर्सेस (टीएलआर) ४८.०८, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस (आरपीसी) २०.८४, ग्रॅज्युएशन आऊटकम (जीओ ) ७७.९७, आऊटरिच अँड इन्क्ल्युजीवीटी (ओआय) ५३.६१ आणि पर्सेप्शन २३.७९ असे गुण बहाल करण्यात आले असून एकूण ४४ गुणांसह ६५ व्या स्थानावर मुंबई विद्यापीठ पोहचले आहे.

या क्रमवारीत अभियांत्रिकीच्या श्रेणीत आयआयटी मुंबईने चौथा क्रमांक मिळवला आहे. औषधशास्त्र श्रेणीत आयसीटी मुंबईने चौथे स्थान प्राप्त केले आहे. दंत महाविद्यालयांच्या श्रेणीत पहिल्यांदाच सामील झालेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details