मुंबई: विद्यापीठाची MCA अभ्यासक्रमाची परीक्षा सोमवार दि.२७ फेब्रुवारी,२०२३ पासून सुरू होणार आहे. अजूनही परीक्षार्थींना परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्र (Hall Ticket) देण्यात आले नसल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्यासाठी परीक्षा फी देखील भरलेली आहे. कमीत कमी एका विद्यार्थ्याला वर्षाला एक लाख रुपये खर्च येतो आणि जर परीक्षा हॉल तिकीट देता आले नाही तर काय करायचे या चिंतेमध्ये अनेक विद्यार्थी आहेत.
कशी द्यायची परीक्षा? मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे 700 ते 800 महाविद्यालये आहेत. मुंबई ,रायगड, पालघर, ठाणे अशा मुंबई महानगर विकास प्राधिकरण अखत्यारित लाखो विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी हजारो विद्यार्थ्यांनी मास्टर ऑफ कम्प्युटर ऍडमिनिस्ट्रेशन या अभ्यासासाठी प्रवेश घेतलेला आहे. मात्र हजारो विद्यार्थ्यांना आपले प्रवेश झालेले आहे. परंतु परीक्षेसाठीच हॉल तिकीट अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे ही परीक्षा आपली होणार का, आपले वर्ष तर वाया जाणार नाही ना याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना लागून आहे.
प्रशासनाचे हात वर:यासंदर्भात मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी प्रफुल्ल पाटील याने ई टीवी भारतसोबत संवाद साधताना सांगितले की, गेल्या आठ दिवसापासून आम्ही सर्व मुंबई विद्यापीठाकडे विचारणा करीत होतो की, आमचे हॉल तिकीट कधी मिळणार. यावर त्यांनी सांगितले की, परीक्षेच्या या कालावधीत मिळणार. परंतु उद्या आमची परीक्षा आहे. तरीही प्रशासनाकडून अद्यापही हॉल तिकीट देण्यात आलेले नाही. यामुळे आम्हाला परीक्षा देता येईल किंवा नाही याबाबत शंका आहे.