महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस सत्र सहाचा निकाल जाहीर - बीएमएस

मुंबई विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या उन्हाळी सत्रातील बीएमएस सत्र ६ चा निकाल 19 जूनच्या रात्री जाहीर केलेला आहे. बीएमएस बरोबरच आजपर्यंत ८४ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.

मुंबई विद्यापीठ

By

Published : Jun 21, 2019, 7:52 AM IST

मंबई - मे महिन्यात घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्रातील बीएमएस (बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) सत्र ६ चा निकाल मुंबई विद्यापीठाने १९ जूनच्या रात्री जाहीर केला आहे. या परीक्षेत ९२१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बीएमएस बरोबरच आजपर्यंत ८४ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.

या परीक्षेत १४,१९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर १४,१५६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ९,२१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व उत्तीर्णतेची टक्केवारी ७८.७४ टक्के एवढी आहे. बीएमएस ही परीक्षा २ मे रोजी सुरू झाली व ९ मे रोजी संपली. सदरचा निकाल ४० दिवसांच्या आत विद्यापीठाने जाहीर केला आहे. मागील वर्षीही विद्यापीठाने बीएमएसचा निकाल वेळेत जाहीर केला होता.

बीएमएस सत्र सहाच्या परीक्षेमध्ये तपासणीसाठी ७५ हजार १५२ उत्तरपत्रिका होत्या. या उत्तरपत्रिका २ हजार २९८ शिक्षकांनी तपासल्या. तर २३ हजार ५८९ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग (ओएसएम) पद्धतीने झाले आहे.

सदरचा निकाल विद्यापीठाच्या www.mumresults.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

बीएमएस हा अभ्यासक्रम महत्वाचा असून यातील अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशी जात असतात. परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास प्रथम प्राधान्य असून या निकालाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक व परीक्षा विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना जाते, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details