मुंबई - देशातील अग्रगण्य म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा ( University of Mumbai ) गौरवशाली इतिहास आहे. अलीकडेच विद्यापीठाला 'नॅक'कडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या मुंबई विद्यापीठाची ख्याती जगभर व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने सतत प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ( Bhagat Singh Koshyari in Mumbai University Covovcation 2021 )
आत्मनिर्भर व्हावे लागेल- राज्यपाल
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा २०२१ या वर्षाचा वार्षिक दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गोव्याचा राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर मोठे लक्ष्य ठेवून त्याच्या यश प्राप्तीसाठी परिश्रम करून विलक्षण असे काही प्राप्त केले तर भारताला जगद्गुरू होता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे राज्यपालांनी सांगितले. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रत्येक स्नातकाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय अध्ययन व अकॅडेमिक क्रेडिट्स देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध शाखांमधील विषय देखील शिकता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जीवघेण्या स्पर्धेला बळी पडू नका - प्रा. सुनील कुमार सिंह