मुंबई :सत्र न्यायालयातील विशेष एटीएस कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान आरोपी नकी अहमद शेख याला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने शेखच्या याचिकेला अंशत परवानगी दिली आहे. खटला जलदगतीने चालवला जाऊ शकतो. खटला सुरु ठेवण्यासाठी फिर्यादी, बचाव पक्षाला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.
2011 पासून तुरुंगात :कोर्टाने म्हटले आहे की, अंडरट्रायल कैद्यांची इतर प्रकरणे प्रलंबित असल्याने दैनंदिन खटला चालवणे शक्य नाही. 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 27 ठार झाल्याच्या आरोपाखाली शेख 2011 पासून तुरुंगात आहे. हा खटला अद्याप सुरु झालेला नाही. यापूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकने काही आरोपींवर खटला चालविण्याचा प्रयत्न केला होता. नकी अहमद शेख यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत खटला सुरु होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरु राहील. मी 11 वर्ष प्रदीर्घ कारावास खटलापूर्व शिक्षा भोगली आहे. त्यामुळे कटला जलद चालवून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.
11 वर्षांहून अधिक तुरुंगवास:मी न्यायालयाला वारंवार सरकार्य केले आहे. तरीदेखील खटला जलद गतीने चालण्यात येत नाही. 11 वर्षांहून अधिक काळ मी तुरुगवास भोगला आहे. विशेष सरकारी वकीलाच्या सोयीनुसार खटला चलवला जातो असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी अनेक जलद गतीने चालवलेल्या खटल्याचा देखील याचिकेत संदर्भ दिला आहे.