महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 13, 2020, 9:01 AM IST

ETV Bharat / state

अवैध प्रवासी वाहतूक: मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात

ऑटो-टॅक्सी चालकांना नियंत्रणात आणण्यासाठी भांडूप वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे टोल नाक्यावर पायी जाणाऱ्या मजुरांना मागे परतवून लावण्यासाठी पोलीस बंदोबस्त असल्यामुळे टोलनाका ओलांडून देण्यासाठी मजुरांकडून हे चालक भरमसाठ पैसे घेत आहेत. अशा अनेक तक्रारी मिळाल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई सरू केली आहे.

Traffic police
वाहतूक पोलीस

मुंबई - ऑटो आणि टॅक्सी चालकांकडून स्थलांतरित मजुरांची लूट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या ऑटो-टॅक्सी चालकांना नियंत्रणात आणण्यासाठी भांडूप वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी रस्त्यावर फिरणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांना थांबवून त्यांच्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात आहे. विशेषतः ठाणे टोल नाक्यांवर पायी जाणाऱ्या मजुरांना मागे परतवून लावण्यासाठी पोलीस बंदोबस्त असल्यामुळे टोलनाका ओलांडून देण्यासाठी मजुरांकडून हे चालक भरमसाठ पैसे घेत आहेत. अशा अनेक तक्रारी मिळाल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई सरू केली आहे.

भांडूप वाहतूक पोलीस

शासनाने जेव्हापासून लॉकडाऊन सुरू केला तेव्हापासून सार्वजनिक वाहतुकीवर बंदी आहे. फक्त अतिआवश्यक कारणांसाठी रिक्षा आणि टेक्सीने वाहतूक करता येते. मात्र, काही रिक्षाचालक जास्त पैसे आकारून मजुरांना मुलुंड चेक नाका पार करून देत आहेत. यासाठी तीन हजार रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. वांद्रा-कुर्ल्या हे मजूर येत आहेत. अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई सुरू केली असून त्यांची वाहने जमा केली जात आहेत. कारवाई सुरू केल्यापासून अवैध वाहतुकीचे प्रमाण कमी झाले, अशी माहिती भांडूप वाहतूक पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details