मुंबई :मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कार्तिकच्या लॅम्बोर्गिनी कारचा फोटो शेअर केला आणि विचित्र कॅप्शन दिले आहे, ते कॅप्शन पुढीलप्रमाणे आहे, 'समस्या? समस्या ये थी की कार चुकीच्या बाजूला उभी होती! 'शहजादा' वाहतूक नियमांची पायमल्ली करू शकतो, या विचाराची 'भूल' करू नका, असे त्यात म्हटले आहे. वाहतूक पोलिसांनी अभिनेत्याच्या वाहनाची नंबर प्लेट अस्पष्ट केली आहे. तरी, असे असतानाही वाहनाची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसून येते.
पोलिसांची कार्तिक आर्यनवरची पोस्ट : कार्तिकने त्याची कार नो पार्किंग झोनमध्ये उभी केली, त्यामुळे पोलिसांनी त्याला दंड बजावला. चलान किती आहे याचा तपशील पोलिसांनी शेअर केला नाही.मुंबई पोलिसांनी कार्तिकच्या चित्रपटांच्या नावांचा आणि संवादांचा वापर करून सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली. त्यांनी कार्तिकचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'भूल भुलैया 2' आणि त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'शेहजादा' यांचा उल्लेख केला आहे. परंतु पोलिसांनी ट्विटमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख केला नाही. एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले की, ज्याच्याकडे वाहन आहे, मग तो अभिनेता असला तरी वाहन नो पार्किंग झोनमध्ये उभे केले तर पोलिस आपले काम करतील.
किंग ऑफ द सिक्वेल : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने प्यार का पंचनामा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या पहिल्या चित्रपटात तो 'मोनोलॉग किंग' म्हणून नावाजला गेला होता. आता 'भूल भुलैया 2' च्या यशानंतर, कार्तिकला 'किंग ऑफ द सिक्वेल' ही पदवी मिळाली. तो लवकरच 'आशिकी' आणि 'हेरा फेरी' सारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांच्या विविध सिक्वेलमध्ये दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
अभिनेता प्रसिद्धीच्या झोतात : 'प्यार का पंचनामा' सारख्या विनोदी मनोरंजनात्मक चित्रपटांपासून ते तीव्र थ्रिलर 'धमाका' पर्यंत, कार्तिकने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या शैलींमध्ये जबरदस्त कामगिरी बजावली आहे. 'प्यार का पंचनामा' मधील त्याचा 5 मिनिटांचा एकपात्री अभिनय व्हायरल झाला होता. त्यानंतर कार्तिक प्रसिद्धीच्या झोतात आला होता. नेटिझन्सनी त्याच्या अप्रतिम डायलॉग डिलिव्हरीसाठी त्याचे कौतुक केले होते. 'भूल भुलैया 2' हा बॉलीवूड चित्रपटांपैकी एक होता ज्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कियारा अडवाणी आणि तब्बू यांनीही मुख्य भूमिका केल्या होत्या. बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक कमाई केली होती. कार्तिकला त्याच्या अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळाली होती.
हेही वाचा : Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवासाठी 21 फूट लांब कवड्यांची खास माळ; विश्वविक्रमात नोंद