मुंबई : मुंबईमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. अशीच वाहतूक कोंडी मेट्रो ३ च्या प्रमुख अश्विनी भिडे यांचे मुंबई महापालिका मुख्यालयात असलेल्या कार्यालयाच्या (in front of Metro woman Ashwini Bhide office) समोर होत आहे. विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीचा फटका अश्विनी भिडे यांनाही बसत आहे. वाहतूक कोंडी मध्ये बहुतेकवेळा रुग्णवाहिकांना अडकलेल्या असतात. वाहतूक कोंडीमध्ये रोजचा रुग्णवाहिका अडकलेल्या असल्याने त्यामधील रुग्णांची परिस्थिती गंभीर होण्याची तसेच वेळप्रसंगी मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Mumbai Traffic jam. Bhide disregard for traffic congestion
मेट्रो वूमन अश्विनी भिडे यांच्या कार्यालयासमोरच वाहतूक कोंडी मेट्रो ३ मुळे वाहतूक कोंडी :मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो रेल्वेचे जाळे पसरवले जात आहे. यासाठी मुंबईमध्ये गेले काही वर्षे मेट्रोचे काम सुरु आहे. मुंबईत सर्वत्र खोदकाम करण्यात आले असून; त्याच्या बाजूला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. यामुळे रस्ते अरुंद झाले असल्याने, सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या समोर तसेच आझाद मैदानात मेट्रो ३ चे काम सुरु आहे. कुलाबा बांद्रा सिप्स मार्गे ही मेट्रो चालणार आहे.
रुग्णांच्या मृत्यूची भीती :मुंबई महापालिका मुख्यालयाला लागून मेट्रो ३ चे भूमिगत काम चालू आहे. यामुळे पालिकेच्या गेट नंबर ६ आणि ३ जवळ रॅम्प उभारण्यात आला आहे. हा रॅम्प अरुंद असल्याने मेट्रो थिएटर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. दुपारपासून रात्रीपर्यंत मेट्रो थिएटर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या वाहतूक कोंडीमध्ये रोजच रुग्णवाहिका अडकत आहेत. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने त्यामधील रुग्णाच्या जीवाचे बरे वाईट होऊ शकते अशी भीती सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडीकडे भिडेचे दुर्लक्ष :मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर, पालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांची कार्यालये आहेत. या पैकी एक कार्यालय पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे आहे. याच अश्विनी भिडे मेट्रो ३ च्या प्रमुख आहेत. भिडे यांच्या कार्यालयासमोर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकलेल्या असतात. अश्विनी भिडे यांह्यासह इतर अतिरिक्त आयुक्तांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. कार्यालयात येताना आणि कार्यालयातून जाताना सुरक्षा रक्षकांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीमधून त्यांच्या वाहनांना मार्ग काढून द्यावा लागत आहे. त्यानंतरही या मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे भिडे यांचे दुर्लक्ष होत आहे.
प्रश्न विचारल्यावर भडकतात भिडे : अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आहेत. त्याच सोबत त्यांच्याकडे मेट्रो ३ चा पदभार राज्य सरकराने सोपवला आहे. पालिकेतील एका पत्रकार परिषदेत मेट्रो विरोधात होणाऱ्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता त्यांना राग अनावर झाला होता. पत्रकारांनी पालिकेत मेट्रोचे प्रश्न विचारू नयेत. मेट्रोच्या कार्यालयाकडे असे प्रश्न विचारावे असा सल्ला देण्याचे काम भिडे यांनी केले. यामुळे भिडे यांनी केलेल्या प्रकारची पत्राकारांमध्ये चर्चा आहे. Mumbai Traffic jam