मुंबई -मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षं पूर्ण होत आहेत. (Mumbai Terrorist Attack 2008). २६ नोव्हेंबर 2008 ला मुंबईत १० दहशतवाद्यांनी निष्पापांची कत्तल करत हाहाकार माजवला होता. यामध्ये १६४ नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या हल्ल्यात शहीद झाले होते. तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांची मदत केली होती. कसाबला फासापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली ती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावण हीने. (Mumbai Terrorist Attack 2008 victim). त्यावेळी ती फक्त ९ वर्षांची होती. आता देविका २३ वर्षांची झाली आहे. ती T.Y.B.A च्या वर्गात आहे. मात्र, २६/११ हल्ल्यात तिच्या उजव्या पायाला कसाबच्या एके ४७ रायफलमधून लागलेल्या गोळीचे व्रण आणि वेदना अजूनही तिच्या मनात कायम आहेत.
Mumbai Terrorist Attack Victim : 26/11 हल्याची साक्षीदार म्हणते,..मला कसाबसारख्या दहशतवाद्यांचा खात्मा करायचा आहे
कसाबला फासापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली ती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावण हीने. (Mumbai Terrorist Attack 2008 victim). त्यावेळी ती फक्त ९ वर्षांची होती. ईटिव्ही भारतने देविकाशी खास बातचीत केली आहे आणि जाणून घेतल्या आहेत हल्याच्या तिच्या कटू आठवणी..
मोठं होऊन आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे - देविका ईटीव्ही भारताशी बोलताना सांगते की, दहशतवादी हल्ल्यात पायाला गोळी लागल्यानंतर मला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझ्या उजव्या पायाला गोळी लागली होती, पायाचे हाड मोडले होते, काही वेळानंतर मी बेशुद्ध पडले. मी त्यावेळी फक्त नऊ वर्षांची होती. बेशुद्ध अवस्थेत मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर काही शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं. आई लहान असतानाच मृत पावली. मी जेव्हा शुद्धीत आली त्यावेळी पप्पा आणि भावाला पाहून मला रडू कोसळलं. पायाला प्रचंड वेदना होत होती. जणू कुणी पायावर दगड ठेवला. त्या एका गोळीने माझं आयुष्य बदलून टाकलं अशी व्यथा देविका हिने मांडली. कसाब तर एक मच्छर होता. या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला धडा शिकवायचा आहे. या मोठं-मोठ्या दहशतवाद्यांचा मला खात्मा करायचा आहे. मला मोठं होऊन आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे असं आपलं स्वप्न असल्याचंही देविकाने सांगितले.