महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

26/11 नंतर मुंबईत कशी आहे सुरक्षाव्यवस्था? जानेवारीपर्यंत बसविण्यात येणार साडेपाच हजार सीसीटीव्ही - Mumbai terror attack

15 years Mumbai terror attack : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांचा असा हल्ला भ्याड स्वरुपाचा होता. या घटनेला आता 15 वर्षे उलटलीय, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत. त्यानंतर देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबई पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली.

Mumbai Police
26/11 पुन्हा घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 7:26 AM IST

Updated : Nov 26, 2023, 7:37 AM IST

मुंबई15 years Mumbai terror attack :26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आठवला तर आजही अंगावर शहारे येतात. त्यामुळं असा हल्ला पुन्हा कुठेही होऊ नये, असं सर्वांना वाटतं. याच पार्श्वभूमीवर अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी मुंबई पोलीसांनी कंबर कसली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यात आला असता मुंबई पोलीस आता कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं ते म्हणाले.

स्टँड-बाय मोडमध्ये पाच हेलिकॉप्टर : मुंबईवर पुन्हा घातपात झाला तर मुंबई पोलीस सतर्क आहेत. ते त्याचा प्रभावीपणे सामना करू शकतील. समुद्र किनारे अन् सागरी मार्गांवर सतत गस्त घातली जात आहे. 26/ 11 ला मुंबईवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर समुद्रातील गस्ती मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आल्या आहेत. पाच हेलिकॉप्टर स्टँड-बाय मोडमध्ये आहेत, ज्यांना अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ताबडतोब बोलावले जाऊ शकते, असं पोलिस अधिकारी म्हणाले.


क्विक रिस्पॉन्स टीमचे प्रशिक्षित कमांडो :अधिकाऱ्याला मुंबईत कोणत्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, मुंबईच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीमचे प्रशिक्षित कमांडो उपस्थित आहेत. QRT मध्ये एकूण 650 कर्मचारी आहेत. संपूर्ण शहरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी सीसीटीव्ही बसवण्यात येत आहेत, असं ते म्हणाले.

11 हजार सीसीटीव्ही : दरम्यान, माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या आदेशानंतर संपूर्ण मुंबईत साडेपाच हजार सीसीटीव्ही अगोदर पासूनच बसवण्यात आले होते. तसंच अजून साडेपाच हजार सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे. जानेवारी महिन्यापर्यंत संपूर्ण मुंबईत 11 हजार सीसीटीव्ही सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बसवण्यात आलेले असतील. चौपाट्यांवरही सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. 11 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मुंबईवर नजर ठेवली जाणार आहे. मुंबईतील लँडिंग पॉईंट्स आणि सी पॉईंट्सवरही थर्मल सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तर समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या वॉच टॉवरमध्ये सीसीटीव्ही असल्यामुळं तेथे पोलिसांची आवश्यकता नाही.



81 लँडिंग पॉईंटवर स्पीड बोट :मुंबईच्या सभोवतालच्या 81 लँडिंग पॉईंटवर सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. एकूण 9 कार्यरत हाय-स्पीड इंटरसेप्टर गस्ती नौकांसह पेट्रोलिंग चालते. तर 3 बोटी राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे आवश्यकता पडल्यास भाडेतत्त्वावर बोटी घेतल्या जातात. मुंबईच्या सुरक्षेसाठी अशा एकूण 24 बोटींचे वाटप करण्यात आले आहे. एका आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितले की, 26/11 सारख्या हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी, कमांडो युनिट्ससह पोलीस आणि इतर विशेष दलांद्वारे त्यानंतरच्या दहशतवादविरोधी कारवायांचा प्रतिसाद आणि आदेश समन्वयित करण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) आहे. अशा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आमची एसओपी तयार आहे.


हेही वाचा -

  1. मानवी रक्ताचा सडा आजही सीएसएमटी रेल्वे स्थानकावर गेलो की आठवतो, चित्रकाराने व्यक्त केल्या आठवणी
  2. ‘असा’ झाला होता 26/11 चा दहशतवादी हल्ला; अनेकांचे जीव वाचवणारा छोटू चायवालाने सांगितल्या कटू आठवणी
  3. मुंबई दहशतवादी हल्ल्याला 15 वर्ष; आजही जखमा ताज्या
Last Updated : Nov 26, 2023, 7:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details