महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले मुंबई टॅक्सीवाले - मुंबई

मुंबईतील वरळी लोअर परेल येथील टॅक्सीवाले प्रत्येक वेळी अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करतात.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले मुंबई टॅक्सीवाले

By

Published : Aug 19, 2019, 10:36 AM IST

मुंबई- सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या पूरग्रस्तांना सर्वच स्तरावरून मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये मुंबईतील वरळी नाका लोअर परळ टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीनेही 'एक हात मदतीचा' या उपक्रमांतर्गत कोल्हापूर-सांगली येथे 1 ट्रक भरून दैनंदिन जीवनातील साधन सामुग्री पाठविण्यात आली. याचा पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले मुंबई टॅक्सीवाले

टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने तांदूळ 450 किलो, गहू पीठ 350 किलो, साखर 450 किलो, डाळ 500 किलो, मीठ 400 किलो, बिस्किटचे बॉक्स 10, सॅनिटरी नॅपकिन 1 हजार 300 नग, तसेच शालेय सर्व वस्तू स्वरूपात देण्यात आल्या आहेत. या पाठवलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा पूरग्रस्तांना मोठा फायदा होईल, त्यांच्यावर जे संकट ओढवले ते आमच्यावर ओढवल्यासारखे आहे. म्हणून त्यांना आपले सगेसोयरे समजून आम्ही मदतीचे कर्तव्य करत आहोत, असे सुबोध मोरे यांनी सांगितले.

मुंबईतील वरळी लोअर परेल येथील टॅक्सीवाले प्रत्येक वेळी अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करतात. तसेच विविध उपक्रम राबवून मुंबईकरांना देखील चांगल्या सोयी सुविधा पुरवत असतात. त्यात सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना त्यांनी आपल्या कमाईतील दिलेली ही मदत लाखमोलाची आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details