महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Suicide News: वांद्रे वरळी सी लिंकवरून उडी मारून एकाची आत्महत्या; आत्महत्येचं गूढ उकलण्यात पोलीस व्यस्त - विनय यादव

Mumbai Suicide News : दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांचं प्रमाण वाढतंय. आता पुन्हा वांद्रे वरळी सी लिंकवरून उडी मारून एकानं आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. आत्महत्येचं गूढ उकलण्यात पोलीस व्यस्त आहेत.

Mumbai Suicide News
मुंबईत आत्महत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 10:05 PM IST

मुंबईMumbai Suicide News : वांद्रे वरळी सी लिंकवरून अरबी समुद्रात उडी मारून एका 42 वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना आज पहाटे 4 वाजता घडलीय. आत्महत्या करणारा व्यक्ती कारमधून उत्तर दिशेला जात होता. सी लिंकच्या 47 क्रमांकाच्या पिलरजवळ येताच त्यानं गाडी थांबवली. नंतर तो रेलिंगवर चढून त्यानं समुद्रात उडी मारलीय.

दिवसभर शोधमोहीम सुरू : नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, नौदल, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमारांची मदत घेण्यात आली. दिवसभर शोधमोहीम सुरू राहिली. मात्र, आत्महत्या करणारा व्यक्ती सापडू शकला नाही. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांनी सांगितलंय की, कारला व्यावसायिक नंबर प्लेट होती. त्याद्वारे गाडीच्या मालकाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर मालकाकडून माहिती मिळाली की, विनय यादव (वय 42) हा त्याचा चालक आहे, जो इनोव्हा चालवतो. जोगेश्वरी पश्चिम येथे विजय आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला एक मुलगाही आहे. चालक विनय यादवनं आत्महत्या का केली, याचा शोध वरळी पोलीस घेत आहेत.


तपास सुरु :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणेचारच्या सुमारास एक कार वांद्रे-वरळी सी लिंकवर आली. या कारच्या चालकानं कार पूलाच्या कडेला उभी करुन कारमधून उतरत थेट समुद्रात उडी घेतली. हा प्रकार येथील सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती स्थानिक वरळी पोलिसांना दिलीय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार ताब्यात घेऊन तपास सुरु केलाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, नाैदल आणि भारतीय तटरक्षक दलानं गुरुवारी सकाळपासून यादवचा शोध सुरु केलाय. (suicide by jumping from Bandra Worli Sea Link)

सुसाईड नोट सापडली :यादवनं समुद्रात उडी का घेतली, हे अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. वरळी पोलिसांनी यादवच्या कुटुंबियांना संपर्क साधलाय. सुसाईड नोट सापडलीय, असं वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय. त्याचप्रमाणं तटरक्षक दल आणि नौदल हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती देखील काटकर यांनी दिलीय.

व्यावसायिकाची आत्महत्या :31 जुलैला ही खार येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकानं अशाच प्रकारे आपली कार थांबवून सी लिंकवरून खाली उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह शिवाजी पार्कच्या किनाऱ्यावर चैत्यभूमी परिसरात दोन दिवसांनी सापडला होता. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरुन जोगेश्वरीतील रहिवासी 42 वर्षीय चालकानं समुद्रात उडी घेतल्याची घटना आज पहाटे घडलीय. विनय यादव, असं या चालकाचं नाव आहे. मुंबई पोलिसांसह अग्निशमन दल, नाैदल आणि भारतीय तटरक्षक दल त्याचा शोध घेत होतं.

हेही वाचा :

  1. Maratha Youth Suicide Nanded: आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या तरुणाची आत्महत्या, प्रश्न निकाली काढण्याची मराठा सकल समाजाची मागणी
  2. Air Hostess Death Case : एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या
  3. Nanavare Couple Suicide Case: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आरोपीला पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details