मुंबई :खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने (MUMBAI SHIVDI MAGISTRATE COURT) काढलेल्या अजामीनपात्र वॉरंट (IN CASE OF BOGUS CASTE REGISTRATION CERTIFICATE) विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती. यावर सरकारी वकील यांना मागील सुनावणी दरम्यान उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी लेखी स्वरुपात युक्तिवाद सादर केला आहे. मात्र आज मूळ तक्रारदार यांनी अधिक वेळ मागितल्याने सुनावणी तहकूब करण्यात (GRANTED TEMPORARY RELIEF TO MP NAVNEET RANA)आली आहे.
पोलीस कारवाई करणार नाही : खा. नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी सुनावणी आजच घेण्यासाठी अग्रही धरला होता. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद पुर्ण झाला तरी तारीख का? असे मर्चंट यांनी मूळ तक्रारदार यांनी वेळ मागितल्या मुळे, याला विरोध करत प्रश्न विचारला आहे. मात्र पुन्हा मूळ तक्रारदार यांच्या विनंतीला अनुसरून या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच डिसेंबर पर्यंत तहकूब केली आहे. मात्र तोपर्यंत खा. नवनीत राणा विरोधातील शिवडी कोर्टानं बजावलेलं अटक वॉरंटवर पोलीस कारवाई करणार नाही, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.