महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना तात्पुरता दिलासा, कोर्टाची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला

बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी (case of bogus caste registration certificate) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना मुंबईतील शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने तात्पुरता (Mumbai Shivdi Magistrate Court has granted temporary relief) दिलासा दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. MP Navneet Rana Caste Case

MP Navneet Rana Caste Case
नवनीत राणा यांना तात्पुरता दिसाला

By

Published : Nov 19, 2022, 7:22 PM IST

मुंबई :खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरण (case of bogus caste registration certificate) विरोधात शिवडी कोर्टाने काढलेला अजामीनपात्र वॉरंट विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती. यावर सरकारी वकीलांना मागील सुनावणी दरम्यान उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज सरकारी वकिलांकडून उत्तर दाखल करण्यात आले आहे. या याचिकेवर आता पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना अंतरिम दिलासा (Mumbai Shivdi Magistrate Court has granted temporary relief) कायम ठेवला आहे. MP Navneet Rana Caste Case



नवनीत राणा यांच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान तक्रारदार यांच्याकडून दाखल करण्यात आलेला अर्जामध्ये त्रुटी असल्याने, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी तक्रारदाराला पुन्हा अर्ज करण्याचे निर्देश दिल्यानंतर, या प्रकरणात पुढील सुनावनी 25 नोव्हेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.




बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलिसात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी शिवडी न्यायालयाने नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची कारवाई केली होती. परंतु हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दंडाधिकारी न्यायालयाला अशाप्रकारे वॉरंट बजावण्याचे अधिकार नाहीत, अशी तक्रार नवनीत कौर राणा यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात करण्यात आली.



जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MP Navneet Rana Caste Case

ABOUT THE AUTHOR

...view details