मुंबई -अंगडिया खंडणी प्रकरणी ( Angadia Extortion Case ) निलंबित पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणीत वाढल्या आहे मुंबई सत्र न्यायालयाने सौरभ त्रिपाठी ( Suspended Police Officer Saurabh Tripathi ) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला ( Saurabh Tripathi bail rejected ) आहे. यापूर्वी देखील मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अंगडिया व्यवसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणात मार्च महिन्यापासून सौरभ त्रिपाठी फरार आहे. या प्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सौरभ त्रिपाठी अद्यापही फरार -सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात आंगडिया व्यवसायिकाने 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ( Hemant Nagarle ) यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची डीसीपी अधिकाऱ्याच्या अंतर्गत चौकशी केल्यानंतर या प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील इतर दोन अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या हे दोन्ही अधिकारी जामीनावर बाहेर आहे. तर, सौरभ त्रिपाठी अद्यापही फरार आहे.
त्रिपाठी यांना शोधण्यात मुंबई पोलीस अपयशी -सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात मुंबई पोलीस, उत्तर प्रदेश, लखनो, दिल्ली या राज्यात देखील मुंबई पोलिसांचे पथक शोध घेतला होता. मात्र. अद्यापही सौरभ त्रिपाठी यांना शोधण्यात मुंबई पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणांमध्ये सौरभ त्रिपाठी यांचे मेहुणे यांना देखील अहवाला मार्फत पैसे पुरवण्यात आलेल्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन अटक केली होती.
त्रिपाठींची सर्वोच्च न्यायालयात धाव -या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये सौरभ त्रिपाठी यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. हवाला ॲापरेटर कडून खंडणी मागितल्याचा आरोप व्यावसायिकाने केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी चौकशी अधिकारी नेमले होते. या अधिकाऱ्याने चौकशी केल्यानंतर या प्रकरणात एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आले होते. मात्रस या प्रकरणातील आरोपी माजी डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्यापही फरार आहे. त्यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या ठिकाणी अद्याप त्यांची याचिका प्रलंबित आहे.
10 लाखांची खंडणी मागीतल्याचा आरोप - डिसेंबर 2021 रोजी अंगडिया असोसिएशननं मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याशी संपर्क साधून डीसीपी त्रिपाठी यांच्यावर आरोप केला की, डीसीपी झोन 2 कडून व्यवसायिकांचा व्यवसाय सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 10 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आयुक्तांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांची नियुक्ती केली आहे.
खंडणीचा गुन्हा -या प्रकरणी झोन 2 मधील एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनचे निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा, वंगाटे एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याएल.टी. मार्ग पोलीस स्टेत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या अधिकार्यांवर डिसेंबर महिन्यात अनेकवेळा अंगाडिया असोसिएनच्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 18 ते 20 लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत.
त्रिपाठी फरार घोषित -पुढील तपासांत त्रिपाठीविरोधातही खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकीय कारवाई म्हणून विभागीय चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला डीसीपींच्या निलंबनासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. 18 फेब्रुवारी रोजी त्रिपाठींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तेव्हापासून ते सेवेवर गैरहजर आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने (सीआयय़ू) त्रिपाठी यांना फरार घोषित केलेलं आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अखेर 20 मार्च रोजी डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनावर स्वाक्षरी केली.
कोण आहेत सौरभ त्रिपाठी?डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगलं काम केलेले होतं. त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिलं आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली. पणस त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान त्रिपाठी यांना पहिले आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. गृहविभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर सही केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. सध्या निलंबित डीसीपी त्रिपाठी फरार असून त्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहे.
काय आहे प्रकरणं?एलटी मार्ग पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यानी आंगाडिया व्यवसायिकांकडून खंडणी उकळल्याचं समोर आलं होतं. अंगाडिया व्यवसायिकाकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणामध्ये डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा समावेश असल्याचं समोर आलं. पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीत त्रिपाठी यांचं नाव समोर आलं. सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगाडिया असोसिएशनकडून महिना 10 लाख खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.