मुंबई -सुशांतसिंग राजपूत प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाची जामीन याचिका सत्र न्यायालयाने आज फेटाळली आहे. शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल, दीपेश, बासित आणि जैद यांच्या जामीन याचिकाही कोर्टाने फेटाळल्या आहेत. कोर्टाने दोन दिवस सुनावणी घेतल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह 6 जणांच्या जामीन अर्जावर निकाल दिला आहे. एनडीपीएस कोर्टाने रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रिया 22 सप्टेंबरपर्यंत तुरूंगातच राहणार आहे.
रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला - mumbai sessions court
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाची जामीन याचिका सत्र न्यायालयाने आज फेटाळली आहे. एनडीपीएस कोर्टाने रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रिया 22 सप्टेंबरपर्यंत तुरूंगातच राहणार आहे.
रिया चक्रवर्तीकडे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. मात्र, कोर्टाकडून सुनावणी होईपर्यंत तिला भायखळा तुरुंगातच रहावे लागेल. रियाला एनडीपीएस कायद्याच्या कलम 16/20 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रिया कैदी म्हणून राहत होती. वकील सतीश मानशिंदे यांनी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासाठी सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली. ज्यावर दोन दिवस युक्तिवाद सुरु होते. सुनावणीदरम्यान एनसीबीने रिया आणि शौविक यांच्या जामिनाला कडाडून विरोध दर्शविला होता. हे दोघे पुराव्याशी छेडछाड करू शकतात, असे त्यांनी कोर्टात सांगितले होते. मात्र, एनसीबीकडून रियावर दबाव आणला जाईल, असा दावा सतीश मानशिंदे यांनी केला. रियाची मानसिक स्थिती बिघडेल असा अंदाजही त्याने वर्तविला आहे. रियाजवळ कोणतीही ड्रग्स जप्त केली गेली नाहीत, असेही ते म्हणाले.