मुंबई :1993 च्या दंगलीदरम्यान दक्षिण मुंबईतील सुलेमान बेकरी परिसरात झालेल्या हत्याकांडाच्या (Suleman Bakery murder Case) सुनावणीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या प्रकरणात मूळ पोस्टमार्टेम अहवाल उपलब्ध नसल्यामुळे साक्षीदार तपासणी खोळंबली (Witness examination interrupted) आहे. आज या प्रकरणात साक्षीदाराची तपासणी (Mumbai Crime) करण्यात येणार होती. मात्र पोस्टमार्टम अहवाल उपलब्ध नसल्याने साक्षीदाराचा जबाब नोंदवण्यास (record statement of witness) सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी नकार दिला आहे. (Latest news from Mumbai)
झेरॉक्स प्रतीच्या आधारे साक्ष तपासणी सुरू :सुलेमान बेकरी हत्याकांडातील महत्त्वाचे कागदपत्र असलेल्या पोस्टमार्टेम अहवाल 2005 मध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नष्ट केली होती. मूळ पोस्टमार्टेम अहवालाअभावी सुनावणीला सत्र न्यायालयाचा नकार दिला आहे. सरकारी पक्षाकडून झेरॉक्स प्रतीच्या आधारे साक्ष तपासणी सुरू करताच बचाव पक्षाचा आक्षेप घेतला आहे. कायदेशीर गुंता निर्माण झाल्यामुळे अन्य पर्याय तपासून कागदपत्रे सादर करण्यासाठी सरकारी पक्ष अर्ज करणार त्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. सरकारी पक्षाने बाजू मांडल्यानंतरच साक्ष तपासणी सुरू होणार आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 13 डिसेंबरला होणार आहे.
सुलेमान बेकरीच्या आवारातून 8 जणांचे मृतदेह आणले :मुंबईतील 1993 च्या जातीय दंगलीदरम्यान पोलिसांनी सुलेमान बेकरी असलेल्या इमारतीत घुसून लोकांवर गोळीबार केला होता व त्यात 9 जण ठार झाले होते असा आरोप आहे. इमारतीत घुसलेल्या पथकातील 7 पोलिस अधिकाऱ्यांवर हत्येसह अन्य आरोपांखाली खटला सुरू आहे. याप्रकरणात मागील सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने पीएफआय अरुण सोनावणे यांची साक्ष तपासली आहे. सोनावणे हे त्यावेळेस डोंगरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कथित गोळीबाराची घटना घडली त्यादिवशी सायंकाळी चारच्या सुमारास जे. जे. हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागातून पोलीस ठाण्यात फोन काॅल आला होता. तो काॅल ऑनड्युटी पीएफआय पाटील यांनी उचलला होता. सुलेमान बेकरीच्या आवारातून 8 जणांचे मृतदेह आणले गेल्याचे फोन काॅलवर सांगण्यात आले. त्या काॅलनंतर मी आणि पीएफआय पाटील जे. जे. रुग्णालयात पोहोचलो. पीएफआय डावरे हे तेथे आधीच उपस्थित होते. त्यांनी मृतदेहांचा पंचनामा केला आणि एडीआर भरला असे सोनावणे यांनी सरकारी पक्षाकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. त्याची दखल घेतानाच सत्र न्यायाधीश कुलकर्णी यांनी खटल्याच्या दिर्घकाळ झालेल्या रखडपट्टीवर तीव्र नाराजीचा सूर आळवला.
खटल्याचा वेळीच निकाल द्यावा :या खटल्याच्या जुन्या फाईल्सची जीर्ण अवस्था झाली आहे. खटल्याचा वेळीच निकाल द्यावा असे या फाईल्सनाही वाटतेय अशी मिश्किल टिप्पणी न्यायाधीश कुलकर्णी यांनी केली. यावेळी आणखी एक साक्षीदार असलेले पोलीस अधिकारी संजय उघाडे हेदेखील न्यायालयात हजर राहिले होते. मात्र त्यांच्या जबाबासंदर्भातील जुनी कागदपत्रे सुस्थितीत नसल्याचे सांगून सरकारी पक्षाने त्यांची साक्ष तपासण्यास असमर्थता दर्शवली. याप्रकरणी 13 डिसेंबरलाला पुढील सुनावणी होणार आहे.