महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sessions Court Question : पेइंगगेस्ट असणारी आई घराबाहेर पडल्यावर बालकाला कोण सांभाळणार, सत्र न्यायालयाचा प्रश्न - विभक्त राहणारी अर्जदार महिला

पेइंगगेस्ट पद्धतीने राहणारी आई रोजगारासाठी घराबाहेर पडल्यावर बालकाला कोण सांभाळणार याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने राहणाऱ्या आईकडे बाळाला सुपूर्द करता येणार नाही असा निकाल सत्र न्यायालयाने कायम ठेवला.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Apr 15, 2023, 1:08 PM IST

मुंबई -अर्जदार महिलेने विधान परिषद आमदाराच्या मुलाशी लग्न करून 2010 पासून संसार थाटला होता. मात्र कुटुंबकलह निर्माण झाल्यामुळे ती वेगळी राहू लागली. परंतु तिच्या मुलाला सासरच्या मंडळींनी स्वतःकडे ठेवले. तिला तिचा 8 वर्षाचा मुलगा स्वतःकडे हवा होता. मात्र बालक तिच्याकडे कसा राहील, जर आई स्वतः कामासाठी घराबाहेर जाते, पेइंग गेस्ट म्हणून राहते. तर बालकांचे संगोपन कसं शक्य आहे? बालक तिच्याजवळ देता येणार नाही हा न्यायदंडाधिकारी यांचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाने कायम ठेवला. बाळ तिच्याकडे ठेवण्यास नकार दिला.


2010 च्या सुमारास राज्यातील एका विधान परिषदेच्या आमदाराच्या मुलासोबत अर्जदार महिलेने लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना काही काळानंतर एक मुलगा झाला. परंतु त्यानंतर कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला. त्याचे कारण अर्जदार महलेशी कुटुंबातीलच मेव्हण्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला,असा तिचा आरोप होता. मात्र याबाबत तिच्या घरच्यांनी कोणतीही दखल घेतली नाही असे तिचे म्हणणे आहे. याबाबत तिने तक्रार देखील दाखल केली.


तिचा नवरा एका माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये कामाला आहे. सासू सासरे, सासरचे मंडळी तिच्यासोबत हिंसाचार करतात म्हणून घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तिने मेव्हणा आणि सासरची मंडळी या सर्वांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा खटला न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोहोचला.


मात्र न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये हा खटल्याची सुनावणी झाली. तेव्हा पतीपासून विभक्त राहणारी अर्जदार महिला हिच्यावर पतीनेच तिच्या चारित्र्य संदर्भात काही संशय व्यक्त केल्याची माहिती न्यायालयाच्या पटलावर मांडली. त्यामुळे महानगर दंडाधिकारी यांनी तक्रार महिला आणि तिचा पती यांच्या युक्तीवादानंतर निकाल दिला. आठ वर्षाचे बाळ आहे आणि स्वतः तक्रारदार महिला जी आई आहे, ती पेइंगगेस्ट म्हणून राहते. ती बाळाला घराच्या बाहेर पडल्यावर कशी सांभाळू शकेल? सबब तिच्याकडे पालन पोषणासाठी बाळ देता येत नाही.


न्यायदंडाधिकारी यांच्या या निर्णयानंतर तक्रारदार महिलेने सत्र न्यायालयामध्ये आठ वर्षाचे बाळ स्वतःकडे मिळावे, यासाठी याचिका दाखल केली. तिच्या याचिकेवर सुनावणी करत असताना सत्र न्यायालयाने तिच्या पतीकडून व्यक्त केलेली चारित्र्याची शंका, तसेच सद्यस्थितीमध्ये महिलाही पेइंग गेस्ट म्हणून राहते. तेव्हा आठ वर्षाच्या बाळाचे शिक्षण पालन पोषण आणि काळजी हे कसे ते करू शकेल अशी परिस्थिती असल्यामुळेच आणि ती परिस्थिती उपलब्ध पुराव्याने स्पष्ट होते म्हणून मुलाचा दाबा तिच्याकडे देण्यास नकार दिला.

हेही वाचा - Alcohol Causes Infertility : जास्त मद्यपान केल्याने पुरुष आणि स्त्रियांमध्ये येते वंध्यत्व, शुक्राणूंचा बदलतो आकार

ABOUT THE AUTHOR

...view details