मुंबई :सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या तिन्ही मुलांना अटकपूर्व जामीन मिळतोय का याबाबतची सुनावणी 20 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी 20 एप्रिल पर्यंत हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांना सीए महेश गुरव याना अंतरिम दिलासा दिलेला आहे.
20 एप्रिल दिलासा :हसन मुश्रीफ यांच्या मुलांबाबत अंमलबजावणी संचलनालयाने कथित कंपनीमध्ये, बँकेमध्ये पैशाचा गैरव्यवहार करण्यात आला असा आरोप ठेवला गेला. यासंदर्भात हा गंभीर आरोप असल्यामुळे विविध प्रकारचे कलम लावून त्यांना अटक करणे जरुरी आहे. त्यांच्या अटकेसाठी साधार काही परिस्थिती आणि इतर पुरावे उपलब्ध आहे. त्यामुळेच तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन रद्द होऊ नये; असे इडीच्या वकिलांचे आधीच्या सुनावणीमध्ये म्हणणे होते. यावेळी देखील अंमलबजावणी संचलनालयाने तीच भूमिका मांडली होती. मात्र, तिन्ही मुलांच्या बाजूने वकिलांनी जोरदार युक्तिवाद केल्यामुळे उच्च न्यायालयाच्या फेब्रुवारीच्या निर्देशा आधारे त्यांना अंतरिम दिलासा 20 एप्रिल पर्यंत मिळावा अशी मागणी केली होती. अखेर तीनही मुलं साजिद नावेद आणि अमित यांना अंतरिम दिलासा मिळालेला आहे.