मुंबई :भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर ओव्हरसीज बॅंकेच्या (Overseas Bank) व्यवस्थापकाने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी बॅंकेतून ज्या कंपनीसाठी 52 कोटी कर्ज (52 crore loan) घेतले ते त्यासाठी न वापरता दुसरीकडे वापरल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर कंबोज यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा देत त्यांचा अटकपूर्व जामीन वाढवला27 जूनपर्यंतआहे.
मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी : या कथित बँक गैरव्यवहारप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने त्यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन 27 जूनपर्यंत वाढविला आहे. तक्रारदार बँकेने आपली तक्रार मागे घेतल्याबाबत कोर्टात शपथपत्र देत चुकीने गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. पुढील सुनावणी 27 जून रोजी होणार आहे. बँक या प्रकरणात पुढील कारवाई करणार नसल्याने मोहित कंबोज यांच्या थांबल्या आहेत.