महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Praveen Darekar : प्रवीण दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर 25 मार्चला निकाल देणार - मुंबई सत्र न्यायालय - Praveen Darekar Praveen Darekar Pre Arrest Bail

विधानसभेचे विरोधी पक्षनते प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील निकाल कोर्टने राखून ठेवला आहे. ( Mumbai Session Court on Praveen Darekar ) दरेकर यांच्याविरोधात मुंबै बँक, ठेवीदार आणि सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यासंदर्भात दरेकरांंनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ( Praveen Darekar Praveen Darekar Pre Arrest Bail ) याप्रकरणावर आता मुंबई सेशन कोर्ट शुक्रवारी 25 मार्चला निकाल देणार आहे.

pravin darkar
प्रवीण दरेकर

By

Published : Mar 23, 2022, 5:23 PM IST

Updated : Mar 23, 2022, 5:37 PM IST

मुंबई -विधानसभेचे विरोधी पक्षनतेप्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील निकाल कोर्टने राखून ठेवला आहे. ( Mumbai Session Court on Praveen Darekar ) दरेकर यांच्याविरोधात मुंबै बँक, ठेवीदार आणि सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यासंदर्भात दरेकरांंनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ( Praveen Darekar Praveen Darekar Pre Arrest Bail ) याप्रकरणावर आता मुंबई सेशन कोर्ट शुक्रवारी 25 मार्चला निकाल देणार आहे. यामुळे दरेकरांना 25 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. न्यायालयात याबाबत सुनावणी पूर्ण झाली. यानंतर जामिनावरील निकाल कोर्टने राखून ठेवला आहे.

'आप'ने केली होती तक्रार -प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेच्या संचालकपदी निवडणूक लढवून 20 वर्षे फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे, तर दरेकरांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे. आम आदमी पार्टीचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेली 20 वर्षे मजूर असल्याचे खोटे भासवून प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेवर संचालक अध्यक्ष म्हणून निवडून येत आहेत. यादरम्यान मुंबई बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा चौकशी करून अहवाल दिले आहेत. 2015 पासून नाबार्डच्या प्रत्येक अहवालात अनियमितता व घोटाळ्यांवर ठपका ठेवलेला आहे, असे तक्रारीत नमूद आहे.

विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरात यांची नियुक्ती -विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबई बँक फसवणूक प्रकरणात राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरात यांची नियुक्ती केली आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान प्रदीप घरात यांनी वकील पत्र सादर केले आहे. आज राज्य सरकारकडून या प्रकरणात लेखी उत्तर सादर करण्यात आले असून युक्तिवादात करिता वेळ मागितल्याने न्यायालयाने राज्य सरकारला 23 मार्च पर्यंत वेळ दिला आहे.

हेही वाचा -Fadnavis On CM : मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही - देवेंद्र फडणवीस

प्रवीण दरेकरांना अटक व्हायलाच हवी -शिवसेना नेत्या मनिषा कायंदे ईटीव्ही भारतशी बोलताना ( Manisha Kayande on Pravin Darekar arrest ) म्हणाल्या, की प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते ही सभागृहाची गरीमा आहे. येथे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा होते. भाजपला लोकांच्या समस्यांशी काही घेणे-देणे नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखला झाला. त्यामुळे दरेकरांना अटक करायला हवी, अशी मागणी कायंदे यांनी केली. तसेच दरेकरांना पदावर राहण्याचा नैतिक ( Pravin Darekar moral right ) अधिकार नाही, असे सांगत लालकृष्ण अडवाणी यांच्यावरील हवालाच्या आरोपांचा कायंदे यांनी दाखला दिला. तसेच दोषमुक्त झाल्यावर ते सभागृहात आल्याची आठवण करून दिली. भाजपचा हा पायंडा असून नवे सदस्यांना त्याचे विस्मरण झाल्याचे कायंदे म्हणाल्या आहेत.

Last Updated : Mar 23, 2022, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details