महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Court Notice To Bacchu Kadu माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाकडून नोटीस जारी - बच्चू कडूची अधिकाऱ्याला मारहाण

प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू ( MLA Bacchu Kadu ) यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण ( MLA Bacchu Kadu Beaten To Officer In Ministry ) केल्याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ( Marine Drive Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बच्चू कडूंना न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर न्यायालयाने आमदार कडूंना जामीनही मंजूर केला आहे. मात्र याप्रकरणी न्यायालयात हजर न राहिल्याने मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Session Court ) बच्चू कडू यांच्याविरोधात नोटीस ( Session Court Notice To MLA Bacchu Kadu ) जारी केली आहे.

MLA Bachchu Kadu
माजी राज्यमंत्री बच्चू कडू

By

Published : Dec 15, 2022, 3:35 PM IST

मुंबई -राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू ( MLA Bacchu Kadu ) यांनी मंत्रालयातील आरोग्य अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलीस ( Marine Drive Police Station ) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज आरोप निश्चिती करण्यात येणार होती. मात्र बच्चू कडू आज मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात नोटीस बजावण्यात ( Session Court Notice To MLA Bacchu Kadu ) आली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 3 जानेवारी रोजी होणार आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ही नोटीस बजावली आहे.

आमदार बच्चू कडू राहिले गैरहजरबच्चू कडू ( MLA Bacchu Kadu ) यांच्या विरोधात आज आरोप निश्चिती करण्यात येणार होती. मात्र बच्चू कडू नागपूरला असल्याने आज उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात नोटीस ( Court Notice To MLA Bacchu Kadu ) बजावली आहे. जर पुढील तारखेला बच्चू कडू अनुपस्थित राहिले तर त्यांच्या विरोधात वॉरंट निघण्याची शक्यता आहे.

गिरगाव कोर्टाने ठोठावली होती न्यायालयीन कोठडीतबच्चू कडू ( MLA Bacchu Kadu Beaten To Officer In Ministry ) यांना 2016 मध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात गिरगाव कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत ठोठावण्यात आली आहे होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court) धाव घेतल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. सध्या बच्चू कडू जामीनावर बाहेर आहेत. बच्चू कडू यांनी या अगोदरही अनेकदा उग्र स्वरूपाचे अनेक आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. प्रहार संघटना ही वेगळे आंदोलन करण्यासाठी ओळखली जाते.

काय आहे प्रकरणसामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू ( MLA Bacchu Kadu Beaten To Officer In Ministry ) यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. 30 मार्च 2016 ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.

बेकायदा काम करून घेण्यासाठी दबावबेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील ( Congress Leader Satej Patil ) यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले होते. ‘राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे’, असे तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadase ) यांनी विधानसभेत सांगितले होते. मात्र आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर, संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details