मुंबईMumbai Session Court :महिलेची छेडछाड प्रकरणात विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानं आरोपीनं न्याय दंडाधिकाऱ्यांवर भर न्यायालयात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. सत्र न्यायालयाचे ( Mumbai Session Court ) न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी यांनी आरोपीला हा दंड ठोठावला असून याबाबतचे आदेश सत्र न्यायालयानं 9 सप्टेंबरच्या रात्री उशीरा जारी केले आहेत.
आरोपीनं केला होता महिलेचा विनयभंग :या आरोपीविरोधात 2021 मध्ये महिलेचा विनयभंग केला म्हणून तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर भोईवाडा ट्रायल कोर्टामध्ये हा खटला दाखल झाला. ट्रायल कोर्टामध्ये आरोपीच्या घडलेल्या घटनेबाबत साक्षीदारांनी साक्ष दिल्या आहेत. त्या पुराव्याची नोंद करण्यात आली होती. त्यावरुन आरोपीचं प्रतिकूल निरीक्षण होतं. त्यामुळे आरोपीनं 8 नोव्हेंबर 2021 रोजी न्यायदंडाधिकारी यांना त्याचं प्रकरण पुढं ढकलावं, अशी विनंती केली होती. मात्र न्यायदंडाधिकारी यांनी ते नाकारलं होतं.
भर न्यायालयात न्याय दंडाधिकाऱ्यावर वक्तव्य :न्यायदंडाधिकारी यांनी त्याची विनंती नाकारल्यामुळेच त्यानं मुंबई सत्र न्यायालयात भोईवाडा ट्रायल कोर्टाविरोधात याचिका दाखल केली. ट्रायल कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी आरोपीच्या संदर्भात तथ्य आणि पुरावे सादर केले. विनयभंगाबाबत साक्षी पुरावे नोंदल्या गेल्यानंतरही आरोपी त्याला मानण्यास तयार नाही. आरोपीची वर्तणूक देखील न्यायालयामध्ये ठीक नव्हती. हे सत्र न्यायालयात वकिलांनी मांडलं. आरोपीनं त्याचा खटला पुढं ढकलण्याची विनंती न्यायदंडाधिकारी यांना केली. त्यावेळेला त्यांच्या संदर्भात अपमानास्पद विधान देखील आरोपीनं केल्याचं वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. आरोपीनं भर न्यायालयात न्यायदंडाधिकारी यांच्या संदर्भात "अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला न्यायदंडाधिकारी कोणी बनवले, देवच जाणो" असं विधान केलं असंही वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केलं.