महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या नवीन महिला प्रदेशाध्यक्षा; अवघ्या १२ तासात दुसरी प्रदेशाध्यक्षा - भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल मध्यरात्री पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने अवघ्या १२ तासांच्या आत नवीन महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

रुपाली चाचणकर राष्ट्रवादीच्या नवीन महिला प्रदेशाध्यक्षा

By

Published : Jul 27, 2019, 2:35 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल (शुक्रवार) रात्री पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने अवघ्या १२ तासांच्या आत नवीन महिला प्रदेशाध्यक्षा निवडल्या आहेत. रुपाली चाकणकर यांची या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात त्यांच्या नावाची घोषणा केली.

चाकणकर या पुण्याच्या माजी शहराध्यक्षा असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी पुण्यात राष्ट्रवादीची धुरा सांभाळली आहे. यानिमित्ताने त्यांना आता राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या भाजपत प्रवेश करणार असल्याने त्यांच्या जागेवर राष्ट्रवादीने तातडीने चाकणकर यांची नियुक्ती करून पक्षाची तत्परता दाखवली आहे. त्यासोबतच राज्यात असलेल्या युवती आणि युवकांनाही यातून संदेश दिला आहे. चित्रा वाघ यांनी भाजपात जाण्यासाठी काल मध्यरात्री आपला राजीनामा एकात्मिकच्या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींना दिला होता. त्यावर राष्ट्रवादीने कोणतीही प्रतिक्रिया न देता आज तातडीने त्यांच्या ठिकाणी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रूपाली चाकणकर यांची नियुक्ती केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details