मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी दुपारी 2 वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात स्वतःहून चौकशीसाठी हजर होणार आहेत. तर, मुंबई शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबईचा प्रवेशद्वारावर सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. टोलनाक्यावर पोलीस प्रत्येक गाडीची तपासणी करीत आहेत. यामुळे मुलुंडच्या आनंद नगर टोल नाक्यावर मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुलुंडच्या आंनद नगर टोलनाक्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा - आनंद नगर टोल नाका मुंबई बातमी
शरद पवार दुपारी ईडीच्या कार्यालयात स्वतःहून चौकशीसाठी जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबईकडे येणाऱ्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. यामुळे मुलुंडच्या आनंद नगर टोल नाक्यावर मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.
शरद पवार दुपारी ईडीच्या कार्यालयात स्वतःहून चौकशीसाठी जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबईकडे येणाऱ्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मुंबईत येणारे कार्यकर्ते असतील तर त्यांना तिथेच थांबवून उतरवले जात आहे. त्याचबरोबर या नाकाबंदीमुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. मुलुंड येथील आनंदनगर टोल नाका ते ठाण्याच्या माजीवाडा इथपर्यंत ४ ते ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा - पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पिडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर ?