मुंबई - शहरात कोरोनाचे नवे 1 हजार 276 रुग्ण आढळून आले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 हजार 262 वर तर मृतांचा आकडा 1 हजार 417 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 17 हजार 472 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 24 हजार 373 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाचे 1 हजार 276 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 हजार 262 वर - mumbai corona latest news
मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 1 हजार 276 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे, मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 43 हजार 262 वर पोहचला आहे. त्यापैकी 1 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 17 हजार 472 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यासह देशातील कोरोनाचे केंद्र बनलेल्या मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या ही 43 हजारांच्या पार गेली आहे. यात आज(बुधवार) काही प्रमाणात घट दिसून आली असून मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 1 हजार 276 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 49 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 36 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. या मृतांमध्ये 27 पुरुष आणि 22 महिला रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये दोन जणांचे वय 40 वर्षाखाली, 27 जणांचे वय 60 वर्षावर तर, 20 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 43 हजार 262 वर पोहचला आहे. त्यापैकी 1 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 17 हजार 472 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 24 हजार 373 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.