महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईकरांना दिलासा : कोरोनाचे 676 नवे रुग्ण, 5570 रुग्णांना डिस्चार्ज, 29 रुग्णांचा मृत्यू

रविवारी 1 हजार 66 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात आज सोमवारी घट होऊन 676 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 29 रुग्णांचा मृत्यू झाला. 5570 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई कोरोना न्यूज
मुंबईकरांना दिलासा : कोरोनाचे 676 नवे रुग्ण, 5570 रुग्णांना डिस्चार्ज, 29 रुग्णांचा मृत्यू

By

Published : May 31, 2021, 10:02 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. काल रविवारी 1 हजार 66 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात आज सोमवारी घट होऊन 676 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 29 रुग्णांचा मृत्यू झाला. 5570 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 433 दिवस -
मुंबईत आज 676 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 6 हजार 251 वर पोहचला आहे. आज 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 884 वर पोहचला आहे. 5 हजार 570 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 66 हजार 796 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 22 हजार 390 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 433 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 36 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 158 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 17 हजार 865 तर आतापर्यंत एकूण 62 लाख 71 हजार 746 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच-
1 मे रोजी 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057, 25 मे ला 1037, 26 मे ला 1362, 27 मे ला 1266, 28 मे ला 929, 29 मे ला 1048, 30 मे ला 1066, 31 मे ला 676 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details