महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे नवे 1,413 रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 40,877 वर - मुंबई कोरोना लाईव्ह अपडेट

मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 1,413 रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी आकडेवारी आरोग्य विभागाने दिली आहे.

mumbai
मु्ंबई कोरोना अपडेट

By

Published : Jun 1, 2020, 9:55 PM IST

मुंबई- कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत आज नव्याने 1,413 रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 40,877 वर तर मृतांचा आकडा 1319 वर पोहचला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

शहरात आज कोरोनाचे नव्याने 1,413 रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 40 मृतांपैकी 26 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 21 पुरुष तर 19 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 20 जणांचे वय 60 वर्षावर होते तर 20 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईत आज 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत एकूण 16,987 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात 1 जूनपर्यंत 201,507 चाचण्या तर आज 3,800 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मुंबईतील चाचण्या आणि निर्जंतुकीकरण -
31 मे पर्यंत सरकारी पालिका कार्यालये, रुग्णालये, पोलीस स्टेशन, बाजार आदी 7,764 ठिकाणी अग्निशमन दलाकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले. अग्निशामक दलाकडून 31,056 चौरस किलोमीटर विभागात फवारणी करण्यात आली. पालिकेच्या किटकनाशक विभागाकडून 108,240 इमारती व इतर ठिकाणी फवारणी करण्यात आली. कीटकनाशक विभागाकडून 97,306 चौरस किलोमीटर परिसरात फवारणी करण्यात आली. तर घनकचरा विभागाकडून 7,500 शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details