मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईमध्ये आज नव्याने 1,244 रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 39,464 वर तर मृतांचा आकडा 1,279 वर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाचे नवे १,२४४ रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा ३९,४६४ वर - BMC
मुंबईत आज कोरोनाचे 1,244 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाचे नव्याने 1,244 रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 44 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासात झाला असून 20 ते 26 मे दरम्यान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचा अहवाल आल्यावर त्यांचा समावेश आजच्या आकडेवारीत करण्यात आला आहे. 52 पैकी 28 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 23 रुग्ण पुरुष तर 29 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये दोघांचे वय 40 वर्षाखाली होते, 22 जणांचे वय 60 वर्षावर होते तर 28 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 430 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत एकूण 16,794 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.